Eid Moon Sighting in Kerala, Chand Raat 2019 : केरळ राज्यात आज होऊ शकतं चंद्र दर्शन

आखाती देशांमध्ये (UAE, Bahrain, KSA, Qatar, Kuwait) हे चंद्र दर्शन सोमवारी सायंकाळी होऊ शकते. सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांमध्ये 5 मे पासून रमजान सुरु झाला होता. इस्लाममध्ये लुनार कॅलेंडर (चंद्र दिनदर्शिका) असते. या कॅलेंडर नुसार महिना हा 29 किंवा 30 दिवसांचा असतो. चंद्र दर्शन होताच नव्या महिन्याची सुरुवात होते. भारताचा शेजारी देश पाकिस्तानने 5 जून रोजी जाहीर केले आहे की, देशभरात ईद 5 जूननंतरच साजरी केली जाईल.

04 Jun, 02:37 (IST)

केरळमध्ये ईदचा उत्साह सुरु होण्यासाठी मुस्लिम बांधवांनी आकाशाकडे डोळे लावले असताना अद्यापही चंद्र दर्शन झाले नाही. त्यामुळे चंद्र दर्शनाची उत्सुकता कायम आहे.

04 Jun, 01:06 (IST)

रमजान ईद अथवा ईद-उल-फितर फितर मुस्लिम समुदायाचा सर्वात मोठा सण असतो. या काळात पहाटे नमाज अदा केली जाते. या काळात सर्वाधिक लोक हे ईदगाह मध्ये जाऊन नमाज अदा करणे पसंत करतात

04 Jun, 24:26 (IST)

 

 - ईदच्या दिवशी सकाळी पहाटे उठणे गरजेचे आहे. पहाटे लवकर उठून नमाज अदा करावी. 

- ईदच्या दिवशी दैनंदिन व्यवहार काहीसे बाजूला ठेवत काही वेळ अल्ला आणि आनंदासाठी राखून ठेवावा. 

- ईदची नमाज ही ईदगाहमध्ये अदा करावी. ईदगाह नसेल तर मशिद किंवा मोकळ्या आकाशाखाली नमाज अदा करावी 

03 Jun, 23:49 (IST)

चंद्र दर्शन झाले की ईदचा उत्साह सुरु होणार. मात्र, हा उत्साह सुरु होण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला चांद मात्र अद्याप न दिसल्याने ही चंद्र दर्शनाची उत्सुकता कायम आहे.

03 Jun, 23:10 (IST)

केरळ राज्यात आज इदचा चांद दिसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर संपूर्ण भारतातील मुस्लिम बांधवांचे लक्ष केरळ राज्याकडे लागले आहे.


Eid Moon Sighting in Kerala, Chand Raat 2019: इस्लामी कँलेंडरनुसार ईद साजरी केली की रमजान महिना पूर्ण होतो. रमजान महिन्याच्या अखेरच्या पर्वात मुस्लिम बांधवांना ओढ लागते ती चंद्र दर्शन घडण्याची. यंदाच्या वर्षी केरळ राज्यात हे चंद्र दर्शन बुधवार म्हणजेच 5 जून 2019 रोजी घडेन. त्यामुळे 5 जुन रोजी हे चंद्र दर्शन पाच मे रोजीच साजरी होईल. शवालच्या चंद्र दर्शनादिवशी ईद-उल-फितर साजरी होते आणि रमजान समाप्त होतो. या ईदला गोड ईद असेही म्हटले जाते.

दरम्यान, आखाती देशांमध्ये (UAE, Bahrain, KSA, Qatar, Kuwait) हे चंद्र दर्शन सोमवारी सायंकाळी होऊ शकते. सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांमध्ये 5 मे पासून रमजान सुरु झाला होता. इस्लाममध्ये लुनार कॅलेंडर (चंद्र दिनदर्शिका) असते. या कॅलेंडर नुसार महिना हा 29 किंवा 30 दिवसांचा असतो. चंद्र दर्शन होताच नव्या महिन्याची सुरुवात होते. भारताचा शेजारी देश पाकिस्तानने 5 जून रोजी जाहीर केले आहे की, देशभरात ईद 5 जूननंतरच साजरी केली जाईल. (हेही वाचा, LIVE Eid Moon Sighting in Middle East, Chand Raat 2019 LIVE: आखाती देशांमध्ये आज दिशू शकतो ईदचा चांद; इथे पाहा ताज्या अपडेट)

रमजान ईद अथवा ईद-उल-फितर फितर मुस्लिम समुदायाचा सर्वात मोठा सण असतो. या काळात पहाटे नमाज अदा केली जाते. या काळात सर्वाधिक लोक हे ईदगाह मध्ये जाऊन नमाज अदा करणे पसंत करतात. या काळात मोठ्या प्रमाणावर खरेदी, नातेवाईकांचे एकमेकांना भेटणे, मित्र-परिवारासोबत आनंदाची देवाणघेवाण होते. लहान थोर आणि महिला मोठ्या आनंदात असतात. बोहरी समाजाचे लोक 4 जून रोजी ईद साजरी करणार आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now