मुंबई मध्ये उद्या (24 मे) दिवशी 30 रोजे पूर्ण करून 25 मे दिवशी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. मुंबई प्रमाणेच महाराष्ट्र आणि भारतामध्येही सोमवारी ईद साजरी होईल. दरम्यान केरळ आणि कर्नाटकामध्ये उद्या ईद आहे.
Eid 2020 Moon Sighting in Maharashtra Highlights in Marathi: मुंबई मध्ये उद्या 30 वा रोजा, 25 मे दिवशी रमजान ईद; हिलाल कमिटीची घोषणा
आज मगरीबच्या प्रार्थनेनंतर मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद सह महाराष्ट्रामध्ये 'चांद रात' बाबत हिलाल कमिटी यंदाच्या रमजान ईदच्या तारखेबद्दल स्पष्टता देणार आहे. यंदा भारतामध्ये ईद 24 की 25 मे साजरी होणार याची माहिती दिली जाणार आहे.
आज भारत देशातील तमाम मुस्लिम बांधवांचे लक्ष हे Moon Sighting Committees च्या चंद्र दर्शनानंतर दिल्या जाणार्या निर्णयाकडे आहे. आज भारतात यंदा रमजान ईद कधी साजरी केली जाणार? याचा निर्णय हिलाल कमिटीकडून दिला जाणार आहे. आज भारतामध्ये 29 वा रमजानचा रोजा आहे. आज चंद्र दर्शन झाल्यास Eid Al-Fitr चा म्हणजेच रमजान ईदचं सेलिब्रेशन उद्या (24 मे) दिवशी होईल. जर चंद्र दर्शन झाले नाही तर 30 दिवसांचा रोजा संपूर्ण करून भारतामध्ये 25 मे, सोमवारी रमजान ईद साजरी केली जाऊ शकते. मग यंदाच्या रमजान ईद बद्दल तुमच्या मनातही उत्सुकता असेल तर मगरीबच्या प्रार्थनेनंतर पहा मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद सह महाराष्ट्रामध्ये 'चांद रात' बाबत हिलाल कमिटी काय निर्णय देते? Chand Raat Mubarak 2020 Greetings: चांद रात मुबारकच्या शुभेच्छा Wishes, Messages, Greetings, GIF Images, HD Wallpapers च्या शेअर करून खास करा तुमच्या मुस्लिम मित्र- मैत्रिणींचा यंदाचा ईदचा सण.
भारतामध्ये दिल्ली, हैदराबाद, उत्तरप्रदेश प्रमाणेच आज महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर मध्ये मुस्लिम बांधवांचे संध्याकाळी चंद्र दर्शनाकडे लक्ष असेल. रमजानच्या शेवटच्या जुम्माच्या रात्री सौदी अरेबिया सह अनेक आखाती देशांमध्ये ईदची तारीख ठरवण्यासाठी प्रयत्न केले गेले मात्र त्यांना चंद्र दिसलेला नाही. तेथे 30 दिवसांचा रोजा पूर्ण करून ईद साजरी केली जाईल.
सध्या जगभर कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत असल्याने मुस्लिम बांधवांबा यंदा ईदचा सण साध्या पद्धतीने आणि घरातच्याघरातच साजरा करण्याचं आवाहन केले आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचं संकट पाहता यंदा घरीच नमाज अदा करण्यास सांगण्यात आलं आहे.