Easy and Quick Mehndi Designs For Eid al-Fitr 2020: ईद उल-फित्र महोत्सवासाठी 'हे' आयडिया वापरून आपल्या हातांवर झटपटबनवामेहंदी ब्रेसलेट पैटर्न (Watch Video Tutorials)
परंतु जर तुम्ही घरून काम करत असाल आणि बराच वेळ न देता येत असल्यास आमच्याकडे तुमच्यासाठी अनोख्या मेहंदी कल्पना आहेत जे तुमचे फक्त पाच ते दहा मिनिटे घेतील.
Mehndi Designs Ideas for Eid 2020: मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना म्हणजेच रमाजान महिन्याची सांगता रमजान ईदने होते. मुस्लीम समुदयासाठी रमजान ईदचं विशेष महत्त्व असतं. परंतु संपूर्ण जग कोरोनाशी झुंज देत असल्याने यंदा उत्सव प्रत्येक वेळीइतके भव्य होणार नाहीत. लोकांना घरी राहून हा महत्त्वपूर्ण उत्सव दिवस साजरा करण्यास सांगितले जात आहे. बहुधा ईद उल-फित्र 24 मे किंवा 25 मे रोजी भारतीय उपखंडात साजरा केला जाईल. ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्याव्यतिरिक्त घरातील महिला या सणानिमित्त आपल्या हातावर मेहंदी लावतात. परंतु जर तुम्ही घरून काम करत असाल आणि बराच वेळ न देता येत असल्यास आमच्याकडे तुमच्यासाठी अनोख्या मेहंदी कल्पना आहेत जे तुमचे फक्त पाच ते दहा मिनिटे घेतील. संपूर्ण हातावर मेहंदी काढण्यापेक्षा आपण केवळ बोट व ब्रेसलेट पॅटर्नची मेहंदी बनवू शकता, जे सोप्पे आणि आकर्षक दिसेल. आम्ही तुमच्यासह फक्त 5 ते 10 मिनिटांत मेहंदीचे सुलभ नमुने बनविण्यासाठी व्हिडिओ ट्यूटोरियल्स शेअर करत आहोत. (Simple Mehndi Designs For Eid 2020: रमजान ईद च्या निमित्ताने यंदा हाता-पायावर झटपट मेहंदी काढण्यासाठी आयडिया देतील हे लेटेस्ट ट्रेन्डस Watch Videos)
सांस्कृतिक उत्सवातील अनेक सुंदर भागांपैकी एक म्हणजे मेहंदी लावणे. परंतु आपल्याला नियमितपणे आकार आणि नमुने रेखाटण्याची सवय नसल्यास हे वेळ घेणारे ठरू शकते. शिवाय, यंदा लॉकडाउनमुळे अनेकांना मेहंदी काढण्यासाठी बाहेर जाता येणार नाही. त्यामुळे हेट्यूटोरियल्स घरच्या घरी तुम्हाला सुंदर, पण सोप्प्याप्रकारे मेहेंदी काढण्यास नक्की मदत करतील.सुलभ ब्रेसलेट मेहंदी
नमुनांचा व्हिडिओ पहा:
Nathicha Nakhra Challenge: 'नथीचा नखरा' चॅलेंज आणि त्यावर व्हायरल होणारे जोक्स - Watch Video
दरम्यान, चंद्रकोर कोणत्या दिवशी कुठे दिसेल यावर ईदची नेमकी तारीख ठरते. इतर वर्षाप्रमाणे ईदला नवे कपडे, दागिन्यांनी शृंगार केला जातो. अनेक महिला हाताप्रमाणेच पायांवरही मेहंदी काढतात. आम्हाला आशा आहे की वरील व्हिडिओ आपल्याला सणासुदीच्या दिवसासाठी या अद्भुत नमुन्यांची मेहेंदी प्रयत्न काढण्यासाठी प्रेरणा देईल.