Earth Day 2020: जागतिक पृथ्वी दिना निमित्त टाळा पर्यावरणाचा -हास करणा-या 'या' गोष्टी आणि जपा वसुंधरेचे पावित्र्य
आज ग्लोबल वॉर्मिंग मुळे पर्यावरणाचा -हास होत चालला आहे.
आज जगभरात 22 एप्रिल हा दिवस जागतिक पृथ्वी दिन अथवा जागतिक वसुंधरा दिवस (World Earth Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवसांची सुरुवात 22 एप्रिल 1970 पासून झाली. यामागे खूपच हृदयद्रावक अशी घटना आहे. खरे पाहत 1969 मध्ये सांता बारबरा, कॅलिफोर्निया मध्ये 30 लाख गॅलेन तेलाच्या गळतीमुळे 10,000 सी बर्ड्स, डॉल्फिन मासे, सील आदि समुद्री जीव मरण पावले. याविरोधात अमेरिकी सीनेटर गेलॉर्ड नेल्सनने पर्यावरणाच्या रक्षणासाठी 22 एप्रिल 1970 या दिवशी 2 कोटीपेक्षा जास्त अमेरिकन विद्यार्थी, प्राध्यापकांना समवेत मोठे आंदोलन केले होते. याआधी पृथ्वीवर एवढ्या मोठया संख्येने आंदोलन कधीच झाले नव्हते. या आंदोलनाला देशभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला ज्यामुळे हा दिवस आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.
त्यामुळे पर्यावरणासाठी जर त्या काळात एवढे मोठे आंदोलन होऊ शकते तर सद्य स्थितीत लोक या गोष्टी का विसरून आहेत. आज ग्लोबल वॉर्मिंग मुळे पर्यावरणाचा -हास होत चालला आहे.
पाहूयात कोणत्या आहेत या गोष्टी:
1. पृथ्वीवरील सूक्ष्म जीवांना आणि पर्यावरणाच -हास करण्यास सर्वात मोठे जबाबदार आहे ते प्लास्टिकचा वापर. त्यामुळे सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन करुन प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. वसुंधरा दिन 2020: पृथ्वी दिनाच्या 50 व्या वर्धापनदिना निमित्त Google ने खास Doodle बनवून मधमाशांसाठी केले समर्पित
2. ग्लोबल वॉर्मिंग पृथ्वीवरील सर्वात मोठा धोका आहे. ज्याला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.
3. औद्योगिकीकरणामुळे कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जित केला जातो. तसेच फ्रिज, कंम्प्यूटर, स्कूटर, कार आदि गोष्टींमधून हा गॅस पर्यावरणात सोडला जातो. त्यामुळे निसर्गाचा -हास होत आहे.
4. तसेच गेल्या काही वर्षात मोट्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यामुळे निसर्गाचा -ाहस होत आहे.
Earth Day 2020 : वसुंधरा दिवस म्हणजे काय? का आणि केव्हापासून साजरा केला जातो हा दिवस ? : Watch Video
यामुळे सर्वात आधी वृक्षतोड थांबवून जास्तीत जास्त झाडे लावली गेली पाहिजे. कारण झाडांमधून आपल्याला ऑक्सिजन मिळते. जे सर्व सजीवांसाठी अत्यंत गरजेचे आहे. तसेच पर्यवारणाचा -हास करणा-या प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. आधुनिक उपकरणांचा वापर नियंत्रणात ठेवला पाहिजे.