Dussehra 2019: दसऱ्याच्या शुभदिनी चुकून ही करु नका 'या' गोष्टी, नाहीतर आयुष्यभर पश्चताप होईल
दसऱ्याचा सण हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. हिंदू धर्मानुसार दसऱ्याच्या सण मोठ्या आनंदाने-उत्साहाने साजरा केला जातो.
Dussehra 2019: नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी मातेची पूजा केल्यानंतर आज दसरा साजरा करण्यात येत आहे. दसऱ्याचा सण हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. हिंदू धर्मानुसार दसऱ्याच्या सण मोठ्या आनंदाने-उत्साहाने साजरा केला जातो. आजचा दिवस दुष्कर्मावर विजय, असत्यावर सत्य आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणून मानला जातो. या दिवशी राज्यभरातील विविध ठिकाणी रावणाचे पुतळे उबभारुन त्याचे दहन केले जाते. तर नवरात्रीच्या दहाव्या दिवशी भगवान राम याने लंकापती रावण याचा वध करत विजय मिळवला होता.
खरंतर सर्वांना माहिती आहे की, दसऱ्याच्या शुभदिनी सर्वजण एकमेकांना सोन्याचे पान म्हणून आपटाच्या झाडाचे पान देऊन शुभेच्छा देतात. आजचा दिवस मंगलदिन मानला जात असून विविध कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात येते. मात्र आजच्या चुकून ही करु नका 'या' गोष्टी, नाहीतर आयुष्यभर पश्चताप होईल.(Happy Dussehra 2019 Wishes: दसऱ्याच्या शुभेच्छा SMS, मराठी ग्रीटिंग्स,Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा विजयादशमीचा सण!)
>> कोणाचाही अपमान करु नका
आजचा दसऱ्याचा दिवस शुभ असल्याने कोणतेही वाईट काम करण्यापासून दूर रहा. तसेच या दिवशी कोणत्याही स्त्री किंवा वृद्ध व्यक्तींचा अपमान करुन नका. असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते.
>> कोणाचेही वाईट करण्यावासून दूर रहा
विजयाच दशमीच्या सण हा दुष्कर्मावर विजय असल्याचे मानले जाते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे आजच्या दिवशी वाईट करण्याचा विचार ही करु नका. यामुळे तुमचे प्रचंड नुकसान होईल.
>> मांसाहार किंवा दारु पिणे टाळा
आजच्या दिवशी रावणाचे दहन केले जाते. तसेच रावणामध्ये असलेल्या वाईट गोष्टींचा नाश करण्याचा आजचा दिवस मानला जातो. त्यामुळे मांसाहार किंवा दारु पिण्यापासून दूर रहा.
>> कोणत्याही प्राण्याची हत्या करु नका
आजच्या दिवशी सर्व शुभ कामे करा. पण कोणतेही दुष्कर्म करण्यापासून दूर रहा. तसेच कोणत्याही प्राण्याला त्रास किंवा हत्या करु नका.
>>झाडे कापण्यापासून दूर रहा
पर्यावरणाचे संतुलन कायम रहावे म्हणून झाडे आपल्या आयुष्यात फार महत्वाचे काम करतात. झाडांपासून ऑक्सिजन उत्सर्जित केला जात असल्याने हवा शुद्ध राहण्यास मदत होते. मात्र झाडे तोडल्यास व्यक्तीच्या आरोग्यावर फार मोठा परिणाम होऊ शकतो.
उत्तर भारतामध्ये आज दसरा आणि विजया दशमीचा सण रामलीला सादर करून साजरा केला जातो. यामध्ये रावणाचा पुतळा उभारून त्याचे दहन केले जाते. या दहनामागे समाजातील आणि तुमच्या आमच्या मनातील वाईट विचार, सवयी यांचा नाश व्हावा अशी अपेक्षा असते. मग यंदा तुम्ही कोणत्या वाईट सवयींचा त्याग करून नवी सुरूवात करणार आहात? हे आम्हांला नक्की सांगा. लेटेस्टलीच्या वाचकांना दसरा आणि विजयादशमी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
(टीप- हा लेख प्राप्त माहितीनुसार लिहिण्यात आला आहे, याचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही तसेच लेटेस्टली मराठी याची कोणतीही पुष्टी करत नाही)