IPL Auction 2025 Live

Hartalika Teej Mehndi Design: हरतालिका तीजच्या दिवशी हातावर काढा 'या' सुंदर आणि सोप्या मेहंदी डिझाईन्स, पहा व्हिडिओ

तुम्ही हे व्हिडिओज पाहून तुमच्या हाताचं सौंदर्य नक्की वाढ शकता.

Hartalika Teej Mehndi Design (फोटो सौजन्य -Flickr and Instagram)

Hartalika Teej Mehndi Design: हिंदू धर्मात तीज व्रताला खूप महत्त्व आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका तीज (Hartalika Teej 2024) व्रत पाळले जाते. हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वतीच्या पूजेला समर्पित असून या दिवशी पूजा, स्नान, दान इत्यादींना विशेष महत्त्व आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 05 सप्टेंबर रोजी दुपारी 12:20 वाजता सुरू होत आहे आणि ही तिथी 06 सप्टेंबर रोजी दुपारी 03:05 वाजता समाप्त होईल. हिंदू धर्मात उदय तिथी व्रतासाठी महत्त्वाची मानली जाते. अशा परिस्थितीत हरतालिका तीज व्रत 06 सप्टेंबर 2024, शुक्रवारी पाळण्यात येणार आहे.

हा दिवस विवाहित महिलांसाठी खूप खास असतो. या दिवशी त्या आपल्या पतीच्या दीर्घआयुष्यासाठी व्रत करतात. हरितालिकेच्या दिवशी विवाहित महिला साजृशृंगार करतात. त्यांचा शृंगार मेहंदीशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे तुम्हीही या दिवशी तुमच्या हातावर हटके मेहंदी डिझाईन्स काढण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास सोप्या आणि सुंदर मेहंदी डिझाईन्सचे व्हिडिओ घेऊन आलो आहोत. तुम्ही हे व्हिडिओज पाहून तुमच्या हाताचं सौंदर्य नक्की वाढ शकता. (हेही वाचा - Hartalika Teej 2024 Mehndi Design: हरतालिका तीजनिमित्त हातावर काढा 'या' खास मेहंदी डिझाईन्स (Watch Video))

हरतालिका तीजच्या दिवशी हातावर काढा या सोप्या आणि सुंदर मेहंदी डिझाईन, पहा व्हिडिओ -

धार्मिक मान्यतेनुसार, हरतालिका तीजच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येते. तसेच सर्व त्रास दूर होतात. या विशेष दिवशी दान केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि देवी-देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात.