Mahaparinirvan Diwas 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकर 'महापरिनिर्वाण दिन' तारीख आणि महत्त्व घ्या जाणून
Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2023 Date: 'महापरिनिर्वाण दिन' दरवर्षी 6 डिसेंबर रोजी येतो. थोर विचारवंत, मानवतावादी कार्यकर्ते आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. तेव्हापासून दरवर्षी महापरिनिर्वाणदिन पाळला जातो.
'महापरिनिर्वाण दिन' (Mahaparinirvan Din 2023) दरवर्षी 6 डिसेंबर रोजी येतो. थोर विचारवंत, मानवतावादी कार्यकर्ते आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. तेव्हापासून दरवर्षी महापरिनिर्वाणदिन पाळला जातो. डॉ. आंबेडकरांचे विचार, त्यांनी सामाजिक उन्नतीसाठी केलेले कार्य आणि मानवी मुल्यांच्या जपणुकीसाठी नोंदवलेला सक्रीय सहभाग आदींची प्रेरणा म्हणून हा दिवस (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Diwas 2023,) ओळखला जातो. लोककल्याणाचे कार्य, लोकांची सामाजिक समज वाढविणे आणि त्याचे महत्त्व या उद्देशाने लक्षवधी नागरिक डॉ. आंबेडकरांचे स्मरण करतात. लक्षवधी आंबेडकरी अनुयायांसाठी हा दिवस अतिशय दु:खाचा आणि तितकाच आंबेडकरी विचारांनी भारलेला असतो.
'महापरिनिर्वाण' म्हणजे काय?
"महापरिनिर्वाण" हा शब्द बौद्ध धर्मातून घेतला गेला आहे. जिथे तो अंतिम आणि पूर्ण निर्वाण किंवा ज्ञानी व्यक्तीच्या मुक्तीच्या संदर्भाने वापरला जातो. हा शब्द एखाद्या आत्मज्ञानी व्यक्तीच्या अंतिम आणि पूर्ण निर्वाण किंवा मुक्तीच्या अनुशंघाने येते. महापरिनिर्वाण हा शब्द प्रामुख्याने सामान्यतः बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांच्या मृत्यूशी संबंधित आहे. ज्यामध्ये त्यांच्या भौतिक अस्तित्वाचा अंत आहे. अगदीच सोप्या भाषेत सांगायचे तर, विवेक आणि विज्ञानवादाची कास धरणारा, निसर्ग आणि मानवता यांचा आदर करणारा, मानवी मुल्यांवर आयुष्याभर वाटचाल करणाऱ्या ज्ञानी व्यक्तीच्या निधनाचा क्षण किंवा दिवस म्हणजे महापरिनिर्वाण असे आपण मानू शकतो. (हेही वाचा, Mahaparinirvan Din 2023 Special Trains: महापरिनिर्वाण दिन निमित्त मध्य रेल्वे चालवणार 14 अनारक्षित विशेष फेर्या; इथे पहा ट्रेनचं वेळापत्रक!)
'महापरिनिर्वाण दिन' म्हणजे काय?
'महापरिनिर्वाण दिन' निमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि एक प्रमुख समाजसुधारक डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या पुण्यतिथीचे स्मरण केले जाते. डॉ. आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. तेव्हापासून हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी देशभरातील लोक, विशेषतः डॉ. आंबेडकरांचे अनुयायी विविध कार्यक्रम आणि समारंभात सहभागी होतात. यामध्ये त्यांच्या पुतळ्यांना आणि स्मारकांना पुष्पांजली अर्पण करणे, त्यांचे जीवन आणि कार्य यावर व्याख्याने आणि चर्चा आयोजित करणे आणि त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांवर प्रकाश टाकणारे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे यांचा त्यात समावेश असतो. (हेही वाचा, Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण म्हणजे काय? डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून का ओळखली जाते?)
बाबासाहेब आंबेडकर या नावाने प्रसिद्ध असलेले डॉ. बी.आर. आंबेडकर हे एक प्रमुख भारतीय न्यायशास्त्रज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय नेते होते. ज्यांनी भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 14 एप्रिल 1891 रोजी महू (आता मध्य प्रदेशात) येथे जन्मलेले आंबेडकर हे महार समाजाचे होते. जे त्या काळात प्रचलित असलेल्या सामाजिक उतरंडीत अस्पृश्य मानले जात होते. प्रचंड कष्ट, विद्वत्ता आणि संघर्षाच्या जोरावर त्यांनी केवळ स्वत:च्याच नव्हे तर समाज आणि भारतातील अवघ्या मानव जातीचा उद्धार केला.