Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2019: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

डॉ. आंबेडकर (Dr. Ambedkar) नावाचा मनुष्य जन्माला आला नसता तर, किती पिढ्या गावकुसाबाहेर सामाजिक शोषणाच्या खाईत कुजल्या असत्या याची कल्पनाच न केलेली बरी. डॉ. आंबेडकरांचे काही प्रेरणादायी विचार इथे देत आहोत. जे गेली अनेक वर्षे आणि यापूढेही सतत प्रेरणा देत राहतील.

Inspirational Quotes and Thought of Dr. Babasaheb Ambedkar | (Photo Credits- File Photo)

Dr.B.R. Ambedkar Jayanti 2019 Quotes : चौदा एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची जयंती. डॉ. आंबेडकर जयंतीचे यंदाचे हे 128 वे वर्ष. वर्ष कोणतेही असो आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहातच साजरी होते. डॉ. आंबेडकरांची जयंती ही केवळ जयंती असत नाही. उत्सवच असतो तो. असंख्यांच्या वेदनेला मिळालेल्या हक्काच्या आवाजाचा. डॉ. आंबेडकर हे अतिशय विद्वान व्यक्तिमत्व. समाजाने त्यांना महामानव ही उपाधी दिली. कारण त्यांचे कार्यच तितके मोठे आहे. ज्यांच्या पिढ्यानपिढ्या सामाजिक वंचितता आणि शोषणाच्या नरकात कुजल्या अशा सर्व समाजाचे प्रेरणास्थान ठरत आंबेडकरांनी या समाजाला त्या नरकाच्या खाईतून बाहेर काढले. डॉ. आंबेडकर (Dr. Ambedkar) नावाचा मनुष्य जन्माला आला नसता तर, किती पिढ्या गावकुसाबाहेर सामाजिक शोषणाच्या खाईत कुजल्या असत्या याची कल्पनाच न केलेली बरी. डॉ. आंबेडकरांचे काही प्रेरणादायी विचार इथे देत आहोत. जे गेली अनेक वर्षे आणि यापूढेही सतत प्रेरणा देत राहतील.

डॉ. बाबासाहे आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

Inspirational Quotes and Thought of Dr. Babasaheb Ambedkar | (Photo Credits- File Photo)

समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Inspirational Quotes and Thought of Dr. Babasaheb Ambedkar | (Photo Credits- File Photo)

समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्तीचा विकास होतो - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Inspirational Quotes and Thought of Dr. Babasaheb Ambedkar | (Photo Credits- File Photo)

माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Inspirational Quotes and Thought of Dr. Babasaheb Ambedkar | (Photo Credits- File Photo)

शील, करुणा, विद्या,मैत्री, प्रज्ञा या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Inspirational Quotes and Thought of Dr. Babasaheb Ambedkar | (Photo Credits- File Photo)

मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Inspirational Quotes and Thought of Dr. Babasaheb Ambedkar | (Photo Credits- File Photo)

माणूस धर्माकरीता नाही, धर्म माणसाकरिता आहे. शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा ! - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Inspirational Quotes and Thought of Dr. Babasaheb Ambedkar | (Photo Credits- File Photo)

काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Inspirational Quotes and Thought of Dr. Babasaheb Ambedkar | (Photo Credits- File Photo)

जो प्रतीकुल लोकमताला घाबरून जात नाही. जो दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्याइतकी बुद्धी शाबूत ठेवतो. ज्याला स्वाभिमान आहे तोच माणूस स्वतंत्र्य आहे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Inspirational Quotes and Thought of Dr. Babasaheb Ambedkar | (Photo Credits- File Photo)

दुसऱ्याच्या सुख-दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Inspirational Quotes and Thought of Dr. Babasaheb Ambedkar | (Photo Credits- File Photo)

शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई तर, वडीलांचे नाव रामजी असे होते. लहानपणापासूनच आंबेडकर यांना वाचनाची प्रचंड आवड होती. या वाचनाच्या आवडीतूनच त्यांचा व्यासंग वाढत गेला. पुढे ते उच्चशिक्षणासाठी विलायतेला गेले. विलायतेहून शिक्षण घेऊन परत आल्यानंतर त्यांनी समाजिक, शैक्षणीक कार्यात स्वत:ला झोकून दिले. त्यांनी अनेक ग्रंथ लिहीले आहेत. शोषीत समाजाचे ते प्रतिनिधी झाले. आंबेडकरांमुळे गावकुसाबाहेर राहणाऱ्या अनेक जात समुहाचा उद्धार झाला. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी बैद्ध समाजात प्रवेश केला. भारतामध्ये ही प्रचंड मोठी घटना होती. देशाच्या एकूण समाजव्यवस्थेवर त्याचे दीर्घकालीन आणि ऐतिहासीक परिणाम झाले. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif