Diwali Padwa Messages 2024: दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा साथीदारा सोबत शेअर करण्यासाठी खास मराठमोळी Wishes, Greetings
संध्याकाळच्या वेळेस पत्नी पतीचं औक्षण करते आणि हा आनंदाचा दिवस साजरा केला जातो.
Happy Diwali Padwa: दिवाळीच्या सणामध्ये बलिप्रतिपदेला (Balipratipada) साजरा केला जाणारा दिवाळी पाडवा (Diwali Padwa) हा महत्त्वाचा सण आहे. नवदांपत्यांसाठी लग्नानंतर येणार्या पहिल्या पाडव्याचं विशेष आकर्षण असतं. या सणाच्या निमित्ताने एकमेकांमधील नातं अधिक दृढ करण्याचं, प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याने दिवाळी पाडवा निमित्त पत्नी पतीचं औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पती देखील पत्नीला ओवाळणी म्हणून काही खास गोष्टी भेटवस्तू म्हणून देतात. मग हा दिवस अजून थोडा खास करण्यासाठी सोशल मीडीया मध्ये WhatsApp Stickers, Status, Facebook Messages, Quotes, Greetings शेअर करत हा दिवस अजून थोडा खास करू शकता.
दिवाळीच्या निमित्ताने पती-पत्नीच्या नात्याला स्पेशल करणारा दिवाळीतला पाडवा हा एक दिवस आहे. दिवाळी पाडवा हा हिंदू धर्मीयांसाठी खास आहे. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक दिवाळी पाडवा असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे. या निमित्ताने सोनं खरेदी देखील मोठ्या उत्साहात केली जाते.