Diwali Padwa 2019: पाडव्याला पतीराजांना चुकूनही देऊ नका ह्या '5' गोष्टी
नव-याच्या शरीर निरोगी राहावे यासाठी या गोष्टी काही अंशी महत्त्वाच्या आहेत असे विवेक वैद्य गुरुजींनी म्हणणे आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. हा दिवस दिवाळी पाडवा (Diwali Padwa) म्हणून देखील संबोधला जातो. दिवाळी हा सण विशेषत: सर्वांचाच सण आहे. मात्र पाडवा सण विवाहित स्त्रियांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. आजच्या दिवशी पत्नी आपल्या पतीच्या सदृढ आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी औक्षण करुन त्यांच्या पतीराजांकडून ओवाळणी घेतात. या बदल्यात त्यांचे पतीदेव ओवाळणीत काही दाग-दागिना देतात. बदलत्या काळानुसार या ओवाळणीत पत्नीला देण्याच्या वस्तूंची पद्धतही बदलत नाही. सोन्या-चांदीच्या दागिन्यांची जागा गॅजेट्स, हि-यांचे दागिने यांसारख्या गोष्टींनी घेतली. हा पाडवा पत्नीसोबत पतीसाठी महत्त्वाचा आहे.
कारण या दिवशी नव-याला केवळ औक्षण करणे हे महत्त्वाचे नसून ते करत असताना त्याचे काही महत्त्वाचे नियम आहेत. नव-याच्या शरीर निरोगी राहावे यासाठी या गोष्टी काही अंशी महत्त्वाच्या आहेत असे विवेक वैद्य गुरुजींनी म्हणणे आहे.
पाहा कोणत्या आहेत या 5 गोष्टी:
1. आजच्या दिवसात नव-याला जेवणात भाकरी खायला देऊ नये
2. पतीराजांना आज शिळं अन्न खायला देऊ नये
3. काळे तीळं असलेले कुठलेही पदार्थ खायला देऊ नये
4. नव-याने पत्नीस किंवा पत्नीने पतीस लाल रंगाचे वस्त्र देऊ नये
5. चामडयाची वस्तू भेटवस्तू देऊ नये.
हेदेखील वाचा- Diwali Padwa Muhurat 2019: दिवाळी पाडवा निमित्त 'या' मुहूर्तावर करा पतीची ओवाळणी; 'या' गोष्टींची घ्या खास काळजी
भेटवस्तू द्यायच्या ज्या गोष्टी वर सांगितल्या आहेत त्या सायंकाळच्या मुहूर्तावेळी करु नये. आज ओवाळणीसाठी 2 मुहूर्त आहेत सकाळी 10 ते 11.30 आणि सायंकाळी 5 ते 7.30 हे दोन शुभ मुहूर्त आहेत. यात सायंकाळच्या मुहूर्तावेळेस वर सांगितलेल्या गोष्टी भेटवस्तू म्हणून देऊ नये. सकाळच्या मुहूर्तास या गोष्टी दिल्या काही हरकत नाही असेही विवेक वैद्य गुरुजींनी लेटेस्टली मराठीशी बोलताना सांगितले.