Diwali Padwa 2020 Messages in Marathi: दिवाळी पाडव्यानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, WhatsApp Stickers शेअर करुन वाढवा नात्यातील गोडवा!

साडेतीन मुहुर्तांपैकी अर्धा मुहूर्त या दिवशी असतो. या दिवशी बलिप्रतिपदा देखील असते. पाडव्या निमित्त महाराष्ट्रातील स्त्रिया पतीला ओवाळतात. तर बलिप्रतिपदेनिमित्त बळी राजाची पूजाही केली जाते.

Diwali Padwa 2020 Messages | File Image

Diwali Padwa 2020 Messages in Marathi: कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा. साडेतीन मुहुर्तांपैकी अर्धा मुहूर्त या दिवशी असतो. या दिवशी बलिप्रतिपदा देखील असते. पाडव्या निमित्त महाराष्ट्रातील स्त्रिया पतीला ओवाळतात. तर बलिप्रतिपदेनिमित्त बळी राजाची पूजाही केली जाते. यंदा पाडव्या निमित्त पतीला ओवाळून स्त्रिया हक्काने गिफ्ट घेतील. परंतु, या दिवसानिमित्त नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या पार्टनरला काही खास शुभेच्छा संदेशही पाठवू शकता. सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), इंस्टाग्राम (Instagram) यावरुन मराठमोळे शुभेच्छा संदेश, ग्रीटिंग्स, Wishes, SMS, Messages, WhatsApp Stickers, Images आणि शुभेच्छापत्रं शेअर करुन बायको/नवऱ्याचा दिवस खास करा.

नवविवाहित दांपत्यासाठी पहिला दिवाळसण अगदी खास असतो. दिवाळीचे एकत्र सेलिब्रेशन, पाडव्या निमित्त ओवाळणी, गिफ्ट्स यामुळे सणांचे हे दिवस अत्यंत आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. यंदाही तुमचाही पहिला पाडवा असेल तर यातील काही शुबेच्छा संदेश तुमच्या नक्कीच कामी येतील. (जाणून घ्या, दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा याचे महत्त्व)

दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे,

उत्तम दिनाचे माहात्म्य आहे,

सुखात जावो तुम्हाला हा पाडवा,

असाच राहो नात्यातला गोडवा!

दिवाळी पाडव्याचा हार्दिक शुभेच्छा!

Diwali Padwa 2020 Messages | File Image

अंधाराला दूर लोटू,

प्रकाशाला मारू मिठी,

एक पणती आपल्यामधल्या,

निखळ अशा नात्यासाठी!

दिवाळी पाडव्याचा हार्दिक शुभेच्छा!

Diwali Padwa 2020 Messages | File Image

पाडव्याच्या शुभमुहूर्तावर,

एकात्मतेचे दिवे लावू,

भिन्न विभिन्न असलो तरीही,

सारे मनाने एक होऊ.

दिवाळी पाडव्याचा हार्दिक शुभेच्छा!

Diwali Padwa 2020 Messages | File Image

आला पाडवा,

रांगोळ्यांच्या चला सजवूया आराशी,

इच्छित लाभो मनी असे ते,

सुखही नांदो पायाशी

दिवाळी पाडव्याचा हार्दिक शुभेच्छा!

Diwali Padwa 2020 Messages | File Image

आभाळी सजला मोतियांचा चुडा,

दारी दिव्यांचा सोनेरी सडा,

गंध गहिरा दरवळला उटण्याचा,

आला दिवाळसण आनंद लुटण्याचा.

दिवाळी पाडव्याचा हार्दिक शुभेच्छा!

Diwali Padwa 2020 Messages | File Image

WhatsApp Stickers च्या माध्यमातून द्या शुभेच्छा!

सण समारंभ, विशेष दिन यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आजकाल WhatsApp अगदी सर्रास वापरले जाते. दिवाळीच्या शुभेच्छाही तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देऊ शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरुन स्टिकर्स डाऊनलोड करा आणि आपल्या नातेवाईक,मित्रमंडळींसोबत शेअर करा.

 

यंदाच्या दिवाळीत अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या सगळ्याचा पुरेपूर आनंद घ्या आणि दिवाळी अगदी दणक्यात साजरी करा.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif