Happy Diwali Padwa 2019 Images: दिवाळी पाडव्या निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या शुभेच्छा

दिवाळी पाडवा (Photo Credits-File Image)

दिवाळीच्या सणामधील लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला दिवाळी पाडवा साजरा करण्यात येतो. हा दिवस साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे या दिवशी सोने खरेदीला फार महत्व दिले जाते. तसेच विवाहित महिला या दिवशी नवऱ्याला औक्षण करतात तर व्यापाऱ्यांसाठी हा वर्षाना प्रारंभ दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच या दिवशी बळीची पूजा करतात. राक्षस कुळात जन्म घेऊनही पुण्याईमुळे श्रीविष्णूने ही तिथी बलीराजाच्या नावाने केली. असुर असून सुद्धा भगवंताचा शरणी गेला म्हणून देवाने त्याचे उद्धार केले. त्यामुळेच या दिवसाला बलिप्रतिपदा सुद्धा असे म्हटले जाते.

यावेळी अश्विन अमावस्येच्या दिवशी दिवाळी पाडवा आल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले आहे. तसेच या दिवशी कार्तिक शुल्क प्रतिपदा क्षयतिथी सुद्धा आली आहे. ही तिथी कोणत्याही दिवशी सुर्योदयाच्या वेळी नसते तिला क्षयतिथी असे म्हटले जाते. 28 तारखेला सकाळी 9 वाजून 8 मिनिटांनी अश्विन अमावस्या संपल्यानंतर त्याच दिवशी बलिप्रतिपदा साजरी करण्यात येणार आहे. तर यंदाच्या दिवाळी पाडव्यानिमित्त मराठमोळी HD GreetingsWallpapers, Wishes शेअर करुन द्या शुभेच्छा! (Diwali Padwa 2019: दिवाळी पाडवा का साजरा केला जातो, जाणून घ्या महत्व)

दिवाळी पाडवा (Photo Credits-File Image)
दिवाळी पाडवा (Photo Credits-File Image)
दिवाळी पाडवा (Photo Credits-File Image)
दिवाळी पाडवा (Photo Credits-File Image)
दिवाळी पाडवा (Photo Credits-File Image)

दीपावली हा संस्कृत शब्द आहे. ह्याचा अर्थ 'दिव्यांच्या ओळी'. भारतीय कॅलेंडर नुसार हा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. हा सण ज्ञानाचा (प्रकाश) अज्ञानावर(अंधकार) विजय म्हणून प्रतित होतो. तसेच दिवाळी पाडव्याला नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त या दिवशी जावयास आहेर करतात.त्याचसोबत पाडव्यावा बळीची प्रतिमा काढून ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना करत पूजा केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो.