Diwali 2019 Panti Painting: दिवाळीनिमित्त दिव्यांची आरास करण्यासाठी सोप्या ट्रिक्स, 'या' पद्धतीने सजवा तुमची पणती
तत्पूर्वी दिवाळीचा सण म्हटलं की, घरातील साफसफाईच्या कामांपासून ते एखादी नवी कोरी वस्तू या सणानिमित्त खरेदी करता येते. तसेच दिवाळीदरम्यान पारंपरिक पद्धतीने रांगोळी, दिवा आणि खासकरुन आकाशकंदील लावल्यास घराची शान अधिकच वाढते.
Diwali Panti Painting Idea: यंदाचा दिवाळीचा सण येत्या 27 तारखेला मोठ्या जल्लोषात दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात येणार आहे. तत्पूर्वी दिवाळीचा सण म्हटलं की, घरातील साफसफाईच्या कामांपासून ते एखादी नवी कोरी वस्तू या सणानिमित्त खरेदी करता येते. तसेच दिवाळीदरम्यान पारंपरिक पद्धतीने रांगोळी, दिवा आणि खासकरुन आकाशकंदील लावल्यास घराची शान अधिकच वाढते. त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण दिवाळीच्या कामासाठी लागतात. पण प्रत्येक वर्षी येणाऱ्या दिवाळीसाठी काय खास करायचे असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. त्यामुळे बाजारात विविध प्रकारचे आकाशकंदील, पणत्या किंवा रांगोळीच्या डिझाइन्स विशेष करुन आपल्याला पहायला मिळतात. तर यंदाच्या दिवाळीनिमित्त जर तुम्हाला खास दिव्यांची आरास करायची असेल तर घरच्याच घरी तुम्ही पणतीचे रंगकाम करु शकता. त्यासाठी फार काही झंझट करावी लागत नाही.
“दिवाळी” रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव मानला जातो. त्यामुळे तुम्हाला घराच्याच घरी पणत्यांचे रंगकाम करायचे असल्यास काही सोप्या ट्रिक्स तुम्ही वापरु शकता. तर यंदाच्या दिवाळीला 'या' पद्धतीने सजवा तुमची पणती. (Diwali 2019 Rangoli Designs: यंदाच्या दिवाळीला अंगणात सुरेख रांगोळी काढण्यासाठी पहा 'या' सोप्या पद्धती Watch Video)
>>पणतीचे रंगकाम करण्यासाठी प्रथम कोणत्याही कंपनीचे फॅबरिक कलर्सचा वापर करावा.
>>तसेच पणत्यांचे रंगकाम करण्यासाठी तुम्ही बाजारातून मातीच्या पणत्या घेऊन त्यावर तुमच्या आवडीनुसार डिझाइन करु शकता.
>>बाजारात विविध प्रकारच्या पणत्या उपलब्ध असल्याने तुम्हाला आवडेल त्या डिझानची पणती खरेदी करुन त्याला रंग देऊन तुमच्या पद्धतीने सजवू शकता.
>>दिवाळीत तुम्हाला पारंपरिक पद्धतीची पणती दिसावी यासाठी सोपी पद्धत
>>बाजारात दिवाळीनिमित्त विविध आकाराच्या पणत्या येतात त्यापैकीच एक मटक्याच्या आकाराची पणती यंदाच्या दिवाळीला तुमच्या घरासमोर लावल्यास शोभून दिसेल.
तर अशा प्रकारे यावेळी दिवाळीचा सणाला तुमच्या हाताने सजवलेली पणती घरासमोर तुम्ही लावू शकता. तसेच तुम्हाला जर पणती स्वतात खरेदी करायची असल्यास धारावी मधील कुंभारवाड्यातून तुम्ही त्या खरेदी करु शकता. तेथे तुम्हाला आणखी विविध डिझाइन्स असलेल्या पणत्या दिसून येतील.