Diwali 2019: धनतेरसच्या दिवशी ‘या’ गोष्टी आवर्जून केल्याने होईल ‘धनलाभ’
धनत्रयोदशीच्या दिवशी घरात कुबेराची पूजा करून पुढील वर्षभर घरात आर्थिक चणचण भासू नये यासाठी प्रार्थना केली जाते.
Diwali 2019: धनत्रयोदशीच्या (Dhanteras) दिवसापासून दिवाळीच्या सेलिब्रेशनला सुरूवात होते. धनत्रयोदशीच्या दिवशी घरात कुबेराची पूजा करून पुढील वर्षभर घरात आर्थिक चणचण भासू नये यासाठी प्रार्थना केली जाते. तसेच धन्वंतरीची पूजा करून आरोग्याच्या देवतेकडे उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. यंदा धनत्रयोदशी 25 ऑक्टोबरला म्हणजेच शुक्रवारी साजरी होणार आहे. या दिवशी संध्याकाळी यमदीपदान केले जाते. यामुळे अकाली मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी प्रार्थना केली जाते. आज आपण धनतेरसच्या दिवशी पूजा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे जाणून घेणार आहोत.
धनतेरसच्या दिवशी करा 13 दिवे प्रज्वलित –
धनतेरसच्या दिवशी दिप प्रज्वलन करण्यास विशेष महत्त्व आहे. या दिवशी 13 दिवे प्रज्वलित केल्यास 13 पटीने लाभ होतो असे म्हटले जाते. धनतेरसच्या दिवशी कुबेराचे पूजन करून चंदन, धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी 13 दिवे लावावे आणि त्याजवळ 13 कवड्या ठेवाव्या. या कवड्या घरातील एखाद्या कोपर्यात दाबून ठेवा. यामुळे अचानक धन लाभ होतो. या दिवशी 13 दिवे घराच्या आत आणि 13 दिवे घराच्या बाहेर ठेवावे. त्यामुळे दारिद्र्य, काळोख आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते.
हेही वाचा - Diwali 2019: धनतेरसला सोनं खरेदी करताय? तर ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
धनतेरसच्या दिवशी पांढऱ्या गोष्टी करा दान –
या दिवशी साखर, बत्ताशे, खीर, तांदूळ, पांढरे कपडे किंवा पांढर्या वस्तूंचे दान केल्याने धनाची कमी होत नाही. तसेच जमा पुंजी वाढते आणि कामात येणारे अडथळे दूर होतात.
किन्नरला करा दान –
धनतेरसच्या दिवशी किन्नरला दान करावे. तसेच त्याच्यांकडून एक शिक्का मागून घ्यावा. किन्नरने स्वखुशीने शिक्का दिल्यास तर आणखी फलदायी ठरेल. हा शिक्का तुम्ही तुमच्या पर्स किंवा तिजोरीत ठेवल्याने कधीच धनाची कमी जाणवणार नाही.
गरजू लोकांना करा दान –
धनतेरसच्या दिवशी प्रत्येक गरजू लोकांना दान करा. या दिवशी दारावर येणाऱ्या भिकाऱ्याला रिकाम्या हाताने जावू देऊ नका.
हेही वाचा - Diwali 2018 : धनतेरस दिवशी मुंबई,पुणे ठिकाणी सोनं, चांदीचा नेमका दर काय ?
धनतेरसच्या दिवशी लावा झाडे –
धनतेरसच्या दिवशी तुम्हाला आवडेल ते झाडं लावा. हे झाड जसे मोठे होईल तसं-तसं तुमचं यश अधिक वाढेल. या दिवशी झाड लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे तुमच्या धनात वाढ होण्यास मदत होते.
धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेपूर्वी आणि नंतर शंखामध्ये पाणी भरा. हे पाणी घराच्या चारी बाजूला शिंपडा. त्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होईल. धनतेरसच्या दिवशी वरील सर्व गोष्टी आवर्जून केल्यास तुम्हाला धनलाभ होईल. (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. लेटेस्टली मराठी यातुन कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही. )