Diwali 2019 Home Decoration Ideas: दिवाळीच्या निमित्ताने कमी बजेट मध्ये 'असे' सजवा तुमचे 'होम स्वीट होम'; जाणून घ्या सोप्प्या ट्रिक्स

या दिवाळीच्या निमित्ताने घरात येणाऱ्या पाहुण्यांना एंट्री करताच प्रसन्न वाटावे आणि दिवाळीचा मूड सेट व्हावा यासाठी तुम्ही या हटके ट्रिक्स वापरून घराची अगदी लास्ट मिनिट सजावट करू शकता.

Diwali Home Decorations Idea (Photo Credits: Pixabay,Youtube)

DIY Diwali Home Decorations: दिवाळी (Diwali 2019) आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपली असताना, फराळापासून ते घराच्या सजावटीपर्यंत तुमची सर्व तयारी झाली असेल ना.. काय म्हणताय.. अजूनही तुम्ही तुमच्या दिवाळी विशेष थीम च्या शोधातच आहात? काळजी करू नका.. यंदा आम्ही तुमच्यासाठी काही खास ट्रीक्स घेऊन आलो आहोत. असं म्हणतात की, दिवाळीच्या सणानिमित्ताने स्वतः लक्ष्मी आपल्या घरी येते, अशा वेळी घर स्वच्छ ठेवणे हे सर्वात जास्त महत्वाचे आहे. या धार्मिक समजुती मान्यतांचा मुद्दा सोडल्यास आपल्या घरात सणाच्या निमित्ताने पाहुण्यांची सुद्धा ये जा असते, या पाहुण्यांना घरात एंट्री करताच प्रसन्न वाटावे आणि दिवाळीचा मूड सेट व्हावा यासाठी तुम्ही या टिप्स वापरून अगदी कमी कमी वेळात आणि खिशाला परवडेल अशा काही भन्नाट सजावटीने तुम्ही तुमच्या घरची शोभा वाढवू शकता.

सजावट म्हंटली की, कंदील, पणत्या हे पारंपरिक पर्याय सोडल्यास अनेकांकडे नुसते बाजरात मिळणारे लाईटिंग्स आणून लावले जातात. यंदा यामध्ये थोडा बदल करून हटके ढंगात दिवाळी सजावटीला तुमचा पर्सनल टच देता येईल असे पर्याय आपण बघणार आहोत .. चला तर मग वाट कसली बघताय.. उठा आणि तुमच्यातील आर्टिस्टला जागे करून सुरु करा दिवाळी विशेष घराचा मेकओव्हर मिशन..

Diwali 2019: या दिवाळीत केवळ अनार, फुलबाजा याच फटाक्यांना फोडण्यास कायदेशीर परवानगी- सर्वोच्च न्यायालय

ग्लास बॉटल्स डेकोरेशन

मागील काही वर्षांपासून हे डेकोरेशन प्रचंड ट्रेंडिंग आहे. काचेच्या रिकाम्या बॉटल्स घेऊन त्यामध्ये तुमच्या आवडीच्या रंगाची लाईट टाकून तुमची गॅलरी मध्ये किंवा खिडकीच्या ग्रिलला अडकवू शकता. तुम्हाला थोडे क्रिएटिव्ह होणे शक्य असेल तर या बॉटल्सवर ऍक्रेलिक पेंट ने आवडीचे डिझाईन काढून एक वेगळा लूक सुद्धा देता येईल.

(Photo Credits: Youtube)

रांगोळी आणि दिवा

काचेचे पारदर्शी कप सध्या मार्केट मध्ये सहज उपलब्ध आहेत, या कप मध्ये रांगोळीच्या रंगाचे थर लावून त्याच्यावर दिवा ठेवून तुम्हाला आकर्षक रोषणाई करता येईल. रांगोळीच्या ऐवजी तुम्ही रंगीत खडे किंवा डाळींचा सुद्धा वापर करू शकता. तुमच्या क्रिएटिव्हिटी नुसार रंगसंगती निवडा.

(Photo Credits: Youtube)

वॉल हँगिंग्स

तुम्हाला शाळेत असताना टाकाऊतून टिकाऊ हा प्रोजेक्ट केल्याचे आठवत असेल, तर वॉल हँगिंग करणे खूपच सोप्पे जाईल. घरात वाया गेलेल्या काही सीडी किंवा आईस्क्रिमच्या काड्या असतील तर त्यांना जोडून तुम्ही एक आकर्षक वॉल पीस तयार करू शकता. यावर रंगीत झालर किंवा मधोमध दिव्याचे स्टिकर्स लावून दिवाळी टच द्या.

कागदी दिवे आणि तोरण

कागदी दिव्यांची माळ किंवा कागदी फुलांची माळ बनवून तुम्ही भिंतीला लावू शकता, यासाठी खाली दिलेला व्हिडीओ नक्की तपासून पहा

Diwali Fashion Trends 2019: खणाचे क्रॉप टॉप ते पैठणी ड्रेस मुलींनो! यंदा दिवाळी मध्ये ट्राय करा 'हे' हटके ट्रेंडी लुक्स

तरंगणारे दिवे

दिवाळीत दिव्यांची परंपरा जुनी असली तरी यंदा थोडा फॅन्सी लूक देऊन तुम्ही एक वेगळा प्रयोग करू शकता. घरच्या घरी काही सोप्प्या ट्रिक्स वापरून पाण्यावर तरंगणारे दिवे तयार करू शकता.. पाहा कसे..

टीप- घरात कुठेही जळमटे किंवा धूळ नसले याची खात्री करून घ्या वाटल्यास सजावट सुरु करण्याआधी स्वच्छतेला प्राधान्य द्या. तसेच, यंदा देशी सजावटीला प्राधान्य द्या, यासाठी तुम्ही मातीच्या दिव्यांपासून ते घरगुती ढंगाच्या कंदिलाची निवड करू शकता.