Diwali 2019: भाऊबीजेच्या दिवशी का केली जाते चित्रगुप्त पूजा? जाणून घ्या शुभ मुहूर्त, मंत्र आणि पूजा विधी

याच तिथीवर भारतातील काही भागात चित्रगुप्त जयंती साजरी करण्याची परंपरा आहे. उद्या म्हणजेच 29 ऑक्टोबर ला साजऱ्या होणाऱ्या या चित्रगुप्त जयंतीचे (Chitragupta Jayanti) महत्व आणि पूजा विधी जाणून घ्या..

Lord Chitragupta (Photo Credits: Wikimedia)

उद्या म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी दिवाळसणाचा शेवटचा म्हणजेच भाऊबीज (Bhaubeej) हा सण साजरा होणार आहे. कार्तिक मासातील शुल्क पक्ष द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. याच तिथीवर भारतातील काही भागात चित्रगुप्त जयंती साजरी करण्याची परंपरा आहे. मुख्यत्वे कायस्थ समाजात तर हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. चित्रगुप्त (Chitragupta) हे मृत्युदेवता यमाचे सहाय्यक म्हणून ओळखले जातात. मानवाच्या पाप- पुण्याचा हिशोब ठेवण्यापासून नशीब लिहिण्यापर्यंत सर्व कामे चित्रगुप्त करतात अशी मान्यता आहे. यामुळेच यमद्वितीयेच्या निमित्ताने चित्रगुप्तांची पूजा करून त्यांची कृपादृष्टी कायम राहावी अशी प्रार्थना केली जाते. उद्या म्हणजेच 29 ऑक्टोबर ला साजऱ्या होणाऱ्या या चित्रगुप्त जयंतीचे (Chitragupta Jayanti) महत्व आणि पूजा विधी जाणून घ्या..

चित्रगुप्त जयंती पूजा मुहूर्त

29 ऑक्टोबर 2019 : दुपारी 1.11 मिनिटांपासून ते 3.25 मिनिटांपर्यंत

चित्रगुप्त जयंती पूजा विधी

यादिवशी सकाळी लवकर उठून प्रातःविधी उरकून नवीन कपडे परिधान करावे. एका पाटावर लाल कापड अंथरून यावर चित्रगुप्त भगवान यांची प्रतिमा किंवा चित्र ठेवावे. यासोबतच गणपतीची प्रतिमा देखील आवर्जून ठेवा. सर्वात आधी गणेशाचे पूजा करून, चित्रगुप्त यांची मूर्ती असल्यास त्याला पंचामृत आणि गंगाजलाने स्नान घालावे. प्रतिमा असल्यास या गोष्टी शिंपडून घ्याव्यात. कुंकू आणि छंदांचे टिळक करून चित्रगुप्तांच्या मूर्तीला अक्षदा वाहाव्यात. यानंतर लाल फुलांची माळ घालून एखादा गोडाचा पदार्थ, पुस्तक आणि पेन यांची देखील पूजा करावी.

Diwali 2019: सावधान! अशा मंडळींसाठी दिवाळी फारशी सुखकारक ठरणार नाही

या मंत्राचे पठण करावे

मसीभाजन संयुक्तश्चरसि त्वम्! महीतले

लेखनी कटिनीहस्त चित्रगुप्त नमोस्तुते

चित्रगुप्त! मस्तुभ्यं लेखकाक्षरदायकं

कायस्थजातिमासाद्य चित्रगुप्त! नमोस्तुते

पौराणिक कथांच्या अनुसार, जेव्हा श्रीविष्णूने सृष्टिरचनेचा विचार केला तेव्हा त्यांच्या नाभीतून कमळ फुल आणि त्यावर ब्रम्हदेव प्रकटले होते. यातूनच ब्रम्हाचा जन्म सृष्टीच्या निर्मितीसाठी झाल्याचे समजते. यावेळी पृथ्वीवासीयांच्या जन्म मृत्यूचा आणि पाप कर्माचा मोबदला देण्यासाठी यमराजाची निर्मिती करण्यात आली या साऱ्याचा भार केवळ यमराजावर पडू नये यासाठी चित्रगुप्त निर्मित झाले म्ह्णूनच चित्रगुप्तांला ब्राम्हणाचे मानस पुत्र म्हणूनही ओळखले जाते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीनुसार लिहिण्यात आला आहे, लेटेस्टली मराठी यामार्फत कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही)