Diabetes Awakening Day: मधुमेह जागृति दिनानिमित्त जाणून घ्या 'हा' होण्यामागची कारणे आणि त्यावरचे घरगुती उपाय
मधुमेह जागृति दिनानिमित्त (Diabetes Awakening Day) मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी घरगुती उपाय म्हणून या महत्त्वाच्या गोष्टी करु शकतात.
Diabetes Awakening Day 2020: पूर्वीच्या काळात 40-50 वर्षानंतर लोकांमध्ये सर्रासपणे आढळून येणारा मधुमेह (Diabetes) हा आजार आता लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये ही पाहायला मिळत आहे. मधुमेहामध्ये तुमच्या शरीरातील रक्तामधील साखरेचे प्रमाण ज्याला आपण ग्लुकोज असं म्हणतो ते अती प्रमाणात वाढते. वास्तविक ग्लुकोजमुळे (Glucose) शरीराला ऊर्जा मिळते. आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातून ग्लुकोज तयार होत असतं. मधुमेहामुळे शरीराला स्वादुपिंडात इन्शुलिनचा पुरवठा कमी होतो. ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण अनियंत्रित होऊन वाढू लागतं. तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळा आणि फास्ट फूडचे शरीरात वाढलेले प्रमाण हेदेखी मधुमेहास कारणीभूत ठरणा-या गोष्टी आहेत.
सध्याच्या काळात तरुणांमध्ये फास्ट फूडचे आहारातील प्रमाण वाढत आहे. येणा-या काही दिवसात त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत किंबहुना भोगत आहेत. अशा स्थितीत या तरुणांमध्ये मधुमेह होण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. म्हणूनच आज मधुमेह जागृति दिनानिमित्त (Diabetes Awakening Day) मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी घरगुती उपाय म्हणून या महत्त्वाच्या गोष्टी करु शकतात.
1. खाण्यापिण्याच्या योग्य वेळा नियमित केल्या पाहिजे. वेळी-अवेळी अरबट-चरबट खाणे टाळा.
2. किमान 8 तास झोप घ्या. तसेच रात्रीचे जास्त उशिरा झोपू नका. आणि सकाळी जास्त उशिरा उठू नका.मधुमेह कंट्रोल मध्ये ठेवण्यात किचन मधील हे जिन्नस करतील मदत; जाणून घ्या झटपट घरगुती उपाय
3. ब्रेड, पास्ता, तांदूळ असे अती स्टार्च असलेले अथवा अती कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ कमी प्रमाणात सेवन करा. तेल अथवा तूपापासून तयार केलेले पदार्थ कमी खा.
4. प्रोसेस्ड फूड अथवा हवाबंद पदार्थ आहारातून पूर्ण वर्ज्य करा.
5. आहारात ताक, मोड आलेली कडधान्य, फळे अथवा उकडलेलं अंड अशा गोष्टीचा समावेश करा. जेवणात सॅलेड जरूर खा.
6. दिवसाला कमीत-कमी 4 ते 5 लीटर पाणी प्या.
7. नियमित व्यायाम वा योगासने करण्यावर भर द्या. कमीत कमी 15 ते 30 मिनिटे तरी घरच्या घरी व्यायाम वा योगासने करा.
मिठाचा अती वापर शरीरासाठी नक्कीच योग्य नाही. मात्र मीठ खाण्याने मधुमेह होत नाही. मधुमेहींना मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण मधुमेह हा एक मेटाबॉलिक आजार आहे. मधुमेह नसेल तर तुम्ही योग्य प्रमाणात मीठ जरूर खाऊ शकता.