Dhulivandan 2023 Messages: धुलिवंदननिमित्त खास Wishes, Greetings, Images शेअर करून साजरी करा यंदाची धुळवड
होळीच्या दुसऱ्या दिवशी मनातील राग, ईर्ष्या, द्वेष विसरून याच होळीची राख एकमेकांना लावून बंधुभावाचा संदेश देत धुलीवंदन साजरी होते.
दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन (Holi 2023) केले जाते. त्यानंतर फाल्गुन महिन्याच्या कृष्ण प्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन (Dhulivandan 2023) हा उत्सव साजरा होतो. आदल्या रात्री पेटवलेल्या होळीची राख एकमेकांना लावून धुलीवंदन किंवा धुळवड खेळली जाते. अनेक ठिकाणी धुलीवंदन हा उत्सव एकमेकांना गुलाल लावून साजरा केला जातो. उत्तर भारतामध्ये धुलीवंदनाच्या दिवशीच रंगपंचमी साजरी होते. सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून धुलीवंदन सणाकडे पाहिले जाते.
महाराष्ट्रात धुलीवंदनाच्या दिवशी बायका पाण्याची तपेली, घागरी, हंडे पाण्याने भरुन होळी पेटवलेल्या जागी ठेवतात. सूर्याच्या उन्हाने हे पाणी तापते. या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घालतात. असे मानले जाते की, या पाण्याने अंघोळ केली असता लहान मुलांना किंवा कोणालाही उन्हाळा बाधत नाही.
तर, धुलीवंदनाच्या दिवशी खास Images, Messages, Wishes शेअर करून आनंदाने साजरी करा धुळवड. (हेही वाचा: Bollywood Holi Songs 2023: होळीवर आधारित बॉलीवूडची सर्वोत्तम गाणी, पार्टीचा उत्साह होईल द्विगुणित)
दरम्यान, मृग नक्षत्रापूर्वी संपूर्ण वातावरण शुद्ध करून पर्जन्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करीत असल्याने होळी पेटवण्याला विशेष महत्त्व आहे. तसेच वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे हा होळी सणामागील उद्देश आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी मनातील राग, ईर्ष्या, द्वेष विसरून याच होळीची राख एकमेकांना लावून बंधुभावाचा संदेश देत धुलीवंदन साजरी होते.