Dhammachakra Paravartan Din: दसऱ्याच्या दिवशीचं का साजरा करतात धम्मचक्र प्रवर्तन दिन, जाणून घ्या बौध्द धर्मात का आहे या दिवसाला विशेष महत्व

नागपुरात डॉं आंबेडकरांनी बौध्द धर्माची दिक्षा घेतली म्हणून नागपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो.

Dhamma Chakra Pravartan Din 2022 Messages (Photo Credits: File Image)

14 ऑक्टोबर 1956 रोजी भारताचे पहिले कायदा मंत्री आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भीमराव आंबेडकर (Dr Babasaheb Aambedkar) यांनी त्यांच्या 3 लाखांहून अधिक अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. ज्या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माची दिक्षा घेतली त्याचं दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhammachakra Paravartan Din) असं म्हणतात. धर्मांतर 14 ऑक्टोबर रोजी झाले असले तरी, धम्मचक्र प्रवर्तन दिन, जो कार्यक्रम चिन्हांकित करतो तो दसऱ्याच्या दिवशी साजरा केला जातो. यंदा दसरा 5 ऑक्टोबरला (October) साजरा केला जाणार आहे. म्हणून धम्मचक्र प्रवर्तन दिन 5 ऑक्टोबर म्हणजेच उद्या साजरा केला जाणार आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरातील (Nagpur) दीक्षाभूमी एक भव्य दिव्य सोहळा साजरा केला जातो. कारण याचं ठिकाणी डॉ. आंबेडकरांसह त्यांच्या अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. लोकांचे बौद्ध धर्मात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन साजरे करण्यासाठी अनेक बौद्ध या ठिकाणी एकत्र येवून हा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा उत्सव साजरा करतात.

 

डॉ. आंबेडकरांचा जन्म हिंदू (Hindu) धर्मात झाला होता. त्यांच्या आयुष्यात त्यांनी विविध धर्मांचा अभ्यास केला. पण अखेरीस त्यांना बौध्द धर्माची शिकवण आवडली किंवा त्याच्या तत्वांना पटली आणि त्यांनी बौध्द धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला.  त्यांनी नैतिकतेच्या दृष्टीकोनातून या धर्माची निवड केली असल्याचं सागितल्या जातं. तरी नागपुरात (Nagpur)  डॉं आंबेडकरांनी (Dr Ambedkar) बौध्द (Buddha Community) धर्माची दिक्षा घेतली म्हणून नागपुरात (Nagpur) धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. (हे ही वाचा:- Dhamma Chakra Pravartan Din 2022 Messages: धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त Wishes, Images, SMS, WhatsApp Status शेअर करून बौद्ध बांधवांना द्या खास शुभेच्छा!)

 

नागपूरची अवघी दीक्षाभूमी (Diksha Bhumi) पंचशील ध्वजांनी नाहून निघाल्याचं आता पाहायला मिळत आहे. गेले दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभुमिवर धम्मचक्र दिन धुमधडाक्यात साजरा करण्यात आला नसल्याने यावर्षी हा उत्सव दणक्यात साजरा केला जाणार आहे. देशभरातील सर्वच राज्यातून बौद्ध अनुयायी येणार आहेत. त्यामुळे लाखो अनुयायी यंदा येतील असा असा दावाही समितीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे उद्या नागपूरच्या दिक्षाभूमीवर लाखोंचा भीमसागर उसळण्याची शक्यता आहे. तरी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या कार्यक्रमास हजेरी लावणार आहे.