Dhamma Chakra Pravartan Din 2023 Messages: धम्मचक्र परिवर्तन दिन शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Status, SMS, Wishes, GIFs, Images करा मोफत डाऊनलोड

आपणही मराठी शुभेच्छा ग्रिटिंग्स, SMS, Wishes, GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करु शकता.

Dhamma Chakra Pravartan Din 2023 Messages: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारताचे पहिले कायदामंत्री, समग्र दलित आणि बहुजन समाजाचे उद्धारकर्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या जवळपास 3 लाख अनुयायांसोबत हिंदू धर्म सोडला आणि बौद्ध धर्मात प्रवेश केला. ही घटना ज्या दिवशी घडली तो दिवस म्हणजे धम्मचक्र परिवर्तन दिन. डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी नागपुरातील दीक्षाभूमी नावाच्या बौद्ध पवित्र स्मारकात 1956 मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनी बौद्ध धर्म स्वीकारला. या दिवशी अनेक बौद्ध धर्मांतराचा उत्सव साजरा करण्यासाठी दीक्षाभूमीवर जमतात. उल्लेखनीय असे की, हा दिवस विजयादशमी (दसरा) असत्ये त्या दिवशीच येतो. इसवी पूर्व 3 ऱ्या शतकात सम्रोट अशोक सम्राट याने सुद्धा बौद्ध धर्मचा स्विकार याच दिवशी केला होता. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमीत्त आंबेडकर अनुयायी परस्परांना शुभेच्छा देतात. आपणही मराठी शुभेच्छा ग्रिटिंग्स, SMS, Wishes, GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करु शकता.

बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर आणि हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर डॉ. आंबेडकर म्हणाले होते, असमानता आणि दडपशाहीच्या बळावर उभा असलेला प्राचीन हिंदू धर्माचा त्याग करुन मी आज पुनर्जन्म घेत आहे. या वेळी आंबेडकरांनी 22 प्रतित्रा केल्या होत्या. त्यातील एक होती, 'मी माझा जुना धर्म, हिंदू धर्म नाकारतो, जो मानवजातीच्या उत्कर्षासाठी हानिकारक आहे आणि जो माणूस आणि माणूस यांच्यात भेदभाव करतो आणि जो मला हीन मानतो', अशा धर्माचा मी त्याग करतो. आंबेडकर यांचा हा निर्णय इतिहासातील क्रांतीकारक निर्णय होता. ज्यामुळे अनेकांचे जगणे सुखकर झाले.

डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्मात केलेला प्रवेश आणि हिंदू धर्माचा त्यात भारतातील लाखो लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. डॉ. आंबेडकर यांनी केलेले धर्मांतर हा त्यांच्या आयुष्यांतील सर्वात शेवटचा आणि अत्युच्च भाग आहे.

आंबेडकर यांनी आपले उभे आयुष्य दिन-दलितांसाठी वाहिले. ते आपले विचार व्यक्त करताना म्हणत, महिलांनी मिळवलेल्या प्रगतीवरून मी समाजाची प्रगती मोजतो. मनाची मशागत करणे हे मानवी अस्तित्वाचे अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे. आयुष्य लांब असण्यापेक्षा महान असायला हवं. माणसं नश्वर आहेत. तसेच कल्पना आहेत. एखाद्या वनस्पतीला जितके पाणी पिण्याची गरज असते तितकीच एखाद्या कल्पनेला प्रसाराची आवश्यक असतो. नाहीतर दोघेही कोमेजून मरतील.