Dev Deepawali 2021: यंदा देव दिवाळी कधी आणि का साजरी केली जाते? जाणून घ्या अधिक

कारण मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू यांनी आपला पहिला अवतार घेतला होता.

देव दिवाळी (Photo Credits-File Image)

Dev Deepawali 2021: कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथिच्या सनातन धर्मात विशेष महत्व आहे. कारण मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू यांनी आपला पहिला अवतार घेतला होता. माणसांच्या द्वारे दीपावलीचा सण साजरा करण्याव्यतिरिक्त आजच्या दिवशी देवतागण दीपावली साजरी करण्यासाठी पृथ्वीवर काशी येथे उतरतात. या दिवशी शीख धर्मियांचे पहिले गुरु श्रीगुरुनानक जी यांनी जन्म घेतला होता. त्याचसोबत या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या महाबलशाली राक्षसाचा वध केला होता. यामुळेच या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून सुद्धा संबोधले जाते. तर जाणून घ्या देव दिवळी का साजरी केली जाते.

कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला देव दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. मान्यता अशी आहे की, या दिवशी स्वर्गातून समस्त देवतागण शंकराची प्रिय नगरी काशीच्या गंगा तटावर येत दिवाळी साजरी करतात. पौराणिक कथेत असा उल्लेख करण्यात आला आहे की, या दिवशी भगवान शिव यांनी महाबलशाली असुर त्रिपुरासुर याचा वध करत देवतांना त्याच्यापासून मुक्त केले होते. याच आनंदात स्वर्गासह समस्त देवगण पृथ्वीवर येत दिवाळी साजरी करतात.(Tulsi Vivah 2021 Shubh Muhurat: तुळशी विवाह साठी पहा यंदाच्या तारखा, विवाह मुहूर्त काय?)

>देव दिवाळी (18 नोव्हेंबर,2021) चा शुभ मुहूर्त

-देव दिवाळी आरंभ रात्री 12.02 वाजता

-देव दिवाळी समाप्त 02.30 वाजेपर्यंत

अशी मान्यता आहे की, या दिवशी कृतिका नक्षत्रात शंकराचे दर्शन घेतल्यास व्यक्ती सात जन्म ज्ञानी आणि धनवान होते. या दिवशी रात्री शंकराची 1008 नावे घेऊन तुळशी वाहून आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल वाहून पूजा केली जाते, या पूजेचे विशेष महत्त्व आहे.