Datta Jayanti 2021 Wishes In Marathi: दत्त जयंतीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देत मंगलमय करा भाविकांचा आजचा दिवस

तुमच्या परिवारामध्ये नातेवाईकांना, मित्रमंडळींना, अप्तेष्टांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा सोशल मीडीयामधमध्ये फेसबूक मेसेजेस, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस,Wishes, Greetings, HD Images, Wallpapers द्वारा देणार असाल तर ही मराठमोळी शुभेच्छापत्र तुम्ही डाऊनलोड करून नक्कीच शेअर करू शकता.

दत्त जयंती शुभेच्छा । File Image

भगवान विष्णू यांच्या 24 अवतारांपैकी एक म्हणजे दत्तात्रेय. अत्री ऋषी आणि अनसुया यांचा पुत्र असलेल्या दत्तात्रेय यांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला झाल्याची आख्यायिका असल्याने दरवर्षी दत्त जयंतीचा (Datta Jayanti) उत्सव हा मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा दत्त जयंती 18 डिसेंबर दिवशी साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्त तुमच्या परिवारामध्ये नातेवाईकांना, मित्रमंडळींना, अप्तेष्टांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा सोशल मीडीयामधमध्ये फेसबूक मेसेजेस, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस,Wishes, Greetings, HD Images, Wallpapers द्वारा देणार असाल तर ही मराठमोळी शुभेच्छापत्र तुम्ही डाऊनलोड करून नक्कीच शेअर करू शकता.

दत्त जयंती दिवशी औदुंबराच्या वृक्षाखाली गुरूचरित्राचं पारायण करण्याची पद्धत आहे. औदुंबर हे दत्ताचे आवडते वृक्ष असल्याचेही मानले जाते. महाराष्ट्रामध्ये विविध दत्त मंदिरामध्ये भाविक मोठी गर्दी करतात. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करतात. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. हे देखील वाचा: Datta Jayanti 2021 Date: यंदा दत्त जयंती 18 डिसेंबरला; जाणून घ्या मार्गशीर्ष पौर्णिमेची तिथी, वेळ काय? 

दत्त जयंती शुभेच्छा

दत्त जयंती शुभेच्छा । File Image

श्री गुरूदेव दत्त

दत्त जयंती शुभेच्छा । File Image

दत्त जयंतीचा मंगलमय दिवस आपणा सर्वांसाठी

सुख आणि समृद्धी समाधान घेऊन येवो हीच कामना

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

दत्त जयंती शुभेच्छा । File Image

सृष्टीचे सर्जन,

अनोखे दर्शन,

त्रिमूर्तीस वंदन

गुरुदेव दत्त!

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

दत्त जयंती शुभेच्छा । File Image

दत्तकथा वसे कानी दत्तमूर्ती ध्यानीमनी

दत्तालागी अलिंगना कर समर्थ हे जाणा

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

दत्त जयंती शुभेच्छा । File Image

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!

धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!

दत्त जयंती  च्या शुभेच्छा

महाराष्ट्रात औदुंबर, गाणगापूर, माहूर, नृसिंहवाडी, कुरवपूर, कर्दळीवन या ठिकाणी दत्ताची मोठी मंदिर आहेत. दत्त ही देवता हिंदू धर्मातील पहिले गुरू असल्याचा समज आहे. हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी भारतभम्रण केल्याचा उल्लेख आहे. जिथे जिथे दत्त गुरू फिरले तेथे त्यांनी आपली स्थान निर्माण केली. या स्थानांच्या माध्यमातून पुढे त्यांच्या अनुयायांनी वसा चालू ठेवला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif