Datta Jayanti 2019: दत्त जन्मोत्सव कसा साजरा करतात ? घ्या जाणून

ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर या तिनी शक्तींचा निवास गुरुदत्तांमध्ये आढळतो. असे मानले जाते की, दत्तगुरुंची आराधना ही इतर सर्व देवादिकांच्या तुलनेत लवकर फलदायी ठरणारी असते

Importance of Datta Jayanti (Photo Credits: twitter)

Importance of Datta Jayanti: तिन तोंडे आणि एक शरीर असा अवतार असलेल्या भगवान दत्त (Lord Datta) यांचे भक्त जगभरात आहेत. त्यामुळे मार्गशीर्ष (Margashirsha) महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती (Datta Jayanti) भारतासह जगभरातील अनेक ठिकाणी साजरी केली जाते. यंदाही दत्त जयंती (Datta Jayanti 2019) मार्गशीर्ष शु. 14 , पोर्णिमा (11डिसेंबर) या दिवशी साजरी होत आहे. पुराण काळात आणि पौराणिक कथांमध्ये सांगितल्यानुसार या दिवशी दत्त जयंती परंपरीने साजरी केली जाते. असंही सांगतात की, मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाळात भगवान दत्तात्रेयाचा जन्म झाला. भगवान दत्तात्रेयांना ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच रुप मानलं जातं. दत्तात्रेयामध्ये गुरु आणि देव दोघांचाही निवास असल्याचे सांगितले जाते. म्हणूनच दतात्रेयांना गुरुदेव दत्त असेही संबोधले जाते. अशा या दत्तगुरुंची जयंती येत्या 11 डिसेंबर रोजी साजरी होत आहे. जाणून घ्या दत्त जन्मोत्सव कसा साजरा करतात ?

दत्तजयंतीचे महत्त्व

सांगितले जाते आणि दत्त भक्तांची भावना अशी की, दत्त जयंती दिवशी दत्ततत्व हे पृथ्वीलावावर नेहमीच्या तुलनेत तब्बल 1000 पटींनी अधिक कार्यरत असते. म्हणूनच या तत्वाचा लाभ घेण्यासाठी लोक दत्त जयंती दिवशी गुरुदत्तांची पूजा मनोभावे करतात.

जन्मोत्सव कसा साजरा करतात?

दत्त जयंती कशी साजरी करावी याबाबत ठोस अशी शास्त्रोक्त माहिती किंवा विधी आढळून येत नाही. पण, साजऱ्या होणाऱ्या दत्त जयंती कार्यक्रमांवर नजर टाकता काही गोष्टी ध्यानात येतात. काही लोक, मंडळं, उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करतात. तसा प्रघात पाहायला मिळतो. तर, दत्त मंदिरात भजन, कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप केले जाते. (हेही वाचा, Datta Jayanti 2019: दत्त जयंती यंदा 11 डिसेंबर दिवशी; जाणून घ्या दत्तात्रेय जयंतीचं महत्त्व, पूजा वेळ काय?)

भगवान दतात्रेयांचे 24 गुरु

भगवान दत्तात्रेयांचे 24 गुरु मानले जातात. त्यांची नावे 1- कबूतर, 2- मधुमक्खी, 3- कुररी पक्षी कुररी पक्षी (पानी के निकट रहने वाले स्लेटी रंग के पक्षी है। 4- भृंगी कीड़ा, 5- पतंगा, 6- भौंरा, 7- रेशम का कीड़ा, 8- मकड़ी, 9- हाथी, 10- हिरण, 11- मछली, 12- सांप, 13- अजगर, 14- बालक 15- पिंगला वेश्या, 16- कुमारी कन्या, 17- तीर बनाने वाला, 18- आकाश-पृथ्वी, 19- जल, 20- सूर्य, 21- वायु, 22- समुद्र, 23- आग, 24- चन्द्रमा अशी आहेत.

असे सांगतात की, साक्षात भगवान शंकराचे रुप दत्तात्रेयामध्ये पाहायला मिळते. ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर या तिनी शक्तींचा निवास गुरुदत्तांमध्ये आढळतो. असे मानले जाते की, दत्तगुरुंची आराधना ही इतर सर्व देवादिकांच्या तुलनेत लवकर फलदायी ठरणारी असते. महाराज दत्तात्रेय हे आजन्म ब्रह्मचारी, अवधूत आणि दिगंम्बर आहेत. ते सर्वव्यापी आणि कोणत्याही संकटात भक्तांच्या मदतीला जाणारे अवतार म्हणून ओळखले जातात.