Dahi Handi 2022 Messages: दहिहंडी निमित्त मराठी Quotes, Wishes, Images, WhatsApp Status शेअर करत द्या खास शुभेच्छा
तरी या डिजीटल मराठमोळ्या शुभेच्छा तुम्ही तिमच्या व्हॉट्स अॅप , फेसबूक , इंस्टाग्रामच्यामाध्यमातून शेअर करु शकता.
दहिहंडी (Dahi Handi) जवळ आली की चाहूल लागते ती गोविंदाची. सुर कानी पडतो गोविंदा रे गोपाला (Govinda Re Gopala). डोळ्यापूढे उभे राहतात ते थरावर थर. दहिहंडीची मज्जा काही औरच. कोरोनाच्या (Corona) पार्श्वभुमिवर गेल्या दोन वर्षात हा गोविंदांचा सुर किंवा थरांच्या थराराच्या आठवणी जरा पुसट झाल्या असल्या तरी यावर्षी मात्र थर लागणारचं! गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभुमिवर कटेकोर नियमावली असल्याने दहिहंडीच्या उत्सवावर बऱ्यापैकी निर्बंध होते. पण यावर्षी पुन्हा पुर्ण जोमाने दहीहंडीचा उत्सव साजरा होणार आहे. तुम्ही देखील तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर या थरांचा थरार नक्कीचं अनुभवला असेल.
या वर्षिची दहिहंडी खास आहे. पण तुमच्या आयुष्यातल्या खास लोकांबरोबर तुम्ही तुमची विशेष आणि अविस्मरणीय दहिहंडी नक्कीच साजरी केली असेल. या दहिहंडीला तुमचे ते दोस्त यार तुमच्या सोबत असतील किंवा नसतील पण या तुमच्या जिग्गी दोस्तांना सोशल मिडीयाच्या (Social Media) माध्यमातून तुम्ही दहिहंडीच्या विशेष शुभेच्छा देवू शकता. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना देण्यासाठी खास हंडीभर डिजीटल शुभेच्छा (Digital Wishesh) आम्ही तुमच्यासाठी घेवून आलोय. तरी या डिजीटल मराठमोळ्या शुभेच्छा तुम्ही तिमच्या व्हॉट्स अॅप (Whats App), फेसबूक (Facebook), इंस्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून शेअर (Share) करु शकता. (हे ही वाचा:-Janmashtami 2022: जन्माष्टमीच्या मुहूर्तावर भगवान श्रीकृष्णांच्या आवडत्या गोड पदार्थांचा करा विशेष बेत)
दह्यात साखर आणि साखरेत भात
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
दहिहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!!
माखनचोर चित्तचोर
गोकुळातील नंदकिशोर
दह्या दुधाची करतो चोरी
दहीहंडीला येतो जोर
दहिहंडीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
यंदाही घरुनच करु
श्रीकृष्णाला नमस्कार
दहीहंडीच्या शुभेच्छा
ऑनलाईन देऊन करु
गर्दीला नकार!
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!
थराला या!
नाहीतर,
धरायला या!!
आपला समजून,
गोविंदाला या!!!
दहिहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!
दहिहंडीच्या भक्तीमय शुभेच्छा!
यावर्षी राज्यभरात दहिहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. उंचच उंच दहीहंड्या, नाच-गाण्यांचे कार्यक्रम, सेलिब्रेटींची हजेरी, भरगोस बक्षिस अशा स्वरुपात हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. तसेच मुंबई पुण्यासारख्या मेट्रो शहरात या कार्यक्रमात मुलीही उत्साहाने सहभाग नोंदवणार आहेत.