Dahi Handi 2019: जगातील सर्वात उंच दहीहंडीचा जागतिक विक्रम आहे मुंबईच्या 'या' पथकाच्या नावे; स्पेन आणि चीनलाही टाकले मागे

भारताबाहेर याच प्रकाराला मानवी पिरॅमिड (Human Pyramid) असे म्हटले जाते. सध्या जगातील सर्वात उंच दहीहंडीचा विक्रम हा मुंबईच्याच एका पथकाच्या नावे आहे.

Dahi Handi in Mumbai (Photo Credits: IANS)

Tallest Human Pyramid: संपूर्ण देशासह जगाच्या इतरही भागात मोठ्या धामधुमीत कृष्ण जन्माष्टमीचा (Krishna Janmashtami) सण साजरा होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमीला मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. आज रात्री 12 वाजता कृष्णाचा पाळणा हलवत या सणाची सांगता होईल. त्यानंतर उद्या सर्वत्र मोठ्या उत्साहात दहीहंडी (Dahi Handi) साजरी होईल. महाराष्ट्रात कोकणात आणि मुंबईमध्ये हा दहीहंडीचा सण मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. भारताबाहेर याच प्रकाराला मानवी पिरॅमिड (Human Pyramid) असे म्हटले जाते. सध्या जगातील सर्वात उंच दहीहंडीचा विक्रम (Guinness World Records) हा मुंबईच्याच एका पथकाच्या नावे आहे.

एकमेकांच्या पाठीवर, खांद्यावर उभे राहून उंचच्या उंच थर उभे केले जातात. शेवटी एकमेक्नाच्या आधाराने उंचावर टांगलेले मडके फोडले जाते. हे काम मोठे जिकीरीचे असते. 25 ऑक्टोबर 1981 साली स्पेनमध्ये Josep-Joan Martínez Lozano यांनी 9 थरांचा, 12 मीटर उंचीचा, 39 फुटांचा मानवी पिरॅमिड उभा केला होता. त्याकाळी या गोष्टीची चर्चा सर्वत्र झाली होती. मात्र दहीहंडी हा मूळ भारतीय सण. या सणाच्या विक्रमावर आपले नाव कोरले नाही ते भारतीय कसले. (हेही वाचा: Dahi Handi 2019: जाणून घ्या का साजरा केला जातो 'दहीहंडी'चा उत्सव; या दिवसाचे महत्व आणि इतिहास)

10 ऑगस्ट 2012 साली प्रताप सरनाईक आणि जय जवान गोविंदा पथक (Jai Jawan Govinda Pathak) संघाने, टीएमसी स्कूल ग्राउंड, ठाणे येथे हा विक्रम मोडीत काढला. त्यांनी त्यावेळी 9 थरांची, 13.34 मीटरची म्हणजेच जवळजवळ 43.79 फूट उंचीची दहीहंडी उभी केली होती. पुढे स्पेनमध्ये दोन संघांनी एकत्र मिळून हा विक्रम मोडण्याचा पर्यंत केला होता. त्यानंतर शेवटी 5 जुलै 2015 साली, चीनच्या एका संघाने 450 लोकांसह 13 मीटर उंचीचे मानवी पिरॅमिड उभे केले व या स्पेनच्या संघाचा विक्रम मोडला. परंतु जय जवान गोविंदा पथकाने सादर केलेल्या दहीहंडीच्या उंचीपेक्षा मोठा पिरॅमिड उभा राहिला असल्याची अजूनतरी कोठे नोंद नाही.

मात्र इतक्या उंच दहीहंडीमुळे अपघातांचे प्रमाण फार वाढले होते. यामुळे शेवटी सरकारने यावर काही निर्बंध घालून दिले आहेत. तसेच गोविंदांच्या सुरक्षेचेही नियम लागू केले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif