Chinchpokli Cha Chintamani Aagman Date 2026: चिंचपोकळीचा चिंतामणी आगमन सोहळा यंदा 29 ऑगस्टला

Chinchpoklicha Chintamani 2026 | Instagram

Chinchpokli Cha Chintamani Aagman Sohala 2026:  मुंबई मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाचा थाट काही निराळाच असतो. जसजसा सार्वजनिक गणेशोत्सवाचा दिवस जवळ येतो तशी बाप्पाच्या भाविकांमध्ये त्याच्या दर्शनासाठीची ओढ वाढत जाते. मंडळातील कार्यकर्त्यांची लगबग सुरू होते. लालबाग, परळ भागामध्ये गणेशोत्सवाच्या काळातील वातावरण चैतन्यमय असते. गणेशोत्सवापूर्वी बाप्पाचे आगमन सोहळे देखील नि:शब्द करणारे आहेत. यामध्ये लालबाग परळ भागातील मुख्य आकर्षण आणि तरूणाईत क्रेझ असणारे मंडळ म्हणजे 'चिंचपोकळीचा चिंतामणी' (Chinchpokli Cha Chintamani). मग पहा यंदा 107 वं वर्ष साजरा करणार्‍या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा कधी आहे?

चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा कधी?

 

View this post on Instagram

 

A post shared by Chinchpoklicha Chintamani (@chinchpoklichachintamani)

यंदा चिंचपोकळीचा चिंतामणी आपलं 107 वं वर्ष साजरं करणार आहे. 14 सप्टेंबर पासून सुरू होणार्‍या यंदाच्या गणेशोत्सवासाठी चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा 29 ऑगस्ट दिवशी आयोजित करण्यात आला आहे. कलागंध आर्ट्स, परळ येथून बाप्पाची मूर्ती बाहेर पडणार आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा अनुभवण्यासाठी मोठी गर्दी रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही 29 ऑगस्टला बाहेर पडणार असाल, लालबाग परळ भागात जाणार असाल तर आधीच नियोजन करा. भाविकांची गर्दी पाहता या भागात आगमन सोहळ्याच्या काळात वाहतूकीमध्ये बदल केले जातात. नक्की वाचा: Mumbaicha Raja 2026 Fake Viral Photos: मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपती च्या यंदाच्या रूपाचे AI निर्मित फोटो वायरल; मंडळाने केले भाविकांना महत्त्वाचं आवाहन .

यंदा सार्वजनिक गणेशोत्सव कधी?

यंदा बाप्पाचं आगमन 14 सप्टेंबर 2026 दिवशी होणार आहे. एरवी दहा दिवसांचा असणारा हा सार्वजनिक गणेशोत्सव यंदा 12 दिवसांचा आहे. वाढीव तिथींमुळे यावर्षी 12 दिवस बाप्पा भाविकांच्या सेवेत असणार आहेत. 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पांना निरोप दिला जाईल.

'चिंचपोकळीचा चिंतामणी 2026' चं अधिकृत रूप आगमन सोहळ्यातच भाविकांना पाहता येणार आहे.  दरम्यान नुकत्याच जारी टीझर मध्ये सजावटीमध्ये बालाजीचं रूप दिसत असल्याने त्याच धर्तीवर सजावट असण्याचा अंंदाज आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement