Kartiki Purnima 2023 Messages: कार्तिकी पौर्णिमेनिमित्त Wallpapers, Wishes, WhatsApp Status, HD Images शेअर करून साजरी करा त्रिपुरारी पौर्णिमेचा मंगलमय दिवस

कार्तिक पौर्णिमेनिमित्त Wallpapers, Wishes, WhatsApp Status, Messages, HD Images शेअर करून तुम्ही हा दिवश खास करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.

Kartiki Purnima 2023 Messages (PC - File Image)

Kartiki Purnima 2023 Messages: हिंदू परंपरेत कार्तिक पौर्णिमेला (Kartiki Purnima 2023) खूप महत्त्व आहे. भगवान विष्णूला समर्पित, या पवित्र महिन्यात भक्त कार्तिकची समाप्ती म्हणून चतुर्दशी तिथीला सत्यनारायण व्रत पाळतात. यावेळी कार्तिक पौर्णिमा तिथी 26 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 03:54 वाजता सुरू होईल आणि 27 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 2:45 वाजता संपेल. धार्मिक मान्यतेनुसार, यावेळी लोक कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. या दिवशी भगवान विष्णूंनी जलप्रलयापासून स्वतःला वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला. त्यामुळे या नद्यांमध्ये स्नान करणे पवित्र मानले जाते.

त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. अनेक ठिकाणी याला ‘देव दिवाळी’ (Dev Diwali) म्हणूनही संबोधले जाते. कार्तिक पौर्णिमेला स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते. कार्तिक पौर्णिमेनिमित्त Wallpapers, Wishes, WhatsApp Status, Messages, HD Images शेअर करून तुम्ही हा दिवश खास करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Tripurari Pournima 2023 Messages In Marathi: त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी ग्रिटिंग्स, WhatsApp Status, Facebook Messages!)

सौभाग्याचे दीप उजळती, मांगल्याची चाहूल लागली

शब्दांचीही सुमने फुलती, येता घरोघरी देव दीपावली

देव दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमेच्या शुभेच्छा!

Kartiki Purnima 2023 Messages (PC - File Image)

स्नेहाचा सुगंध दरवळला,

आनंदाचा सण आला.

विनंती आमची परमेश्वराला,

सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा!

Kartiki Purnima 2023 Messages (PC - File Image)

नव्या सणाला उजळू दे आकाश

सर्वत्र पसरू दे लख्ख प्रकाश, जुळावे नवे प्रेमबंध हा एकच ध्यास

आला आज कार्तिक पौर्णिमेचा सण खास

देव दिवाळीच्या आणि कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Kartiki Purnima 2023 Messages (PC - File Image)

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही दिशा

घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,

तुम्हाला व तुमच्या परिवाराला

त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

Kartiki Purnima 2023 Messages (PC - File Image)

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,

लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,

सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,

सोन्यासारख्या लोकांसाठी खास,

कार्तिकी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

Kartiki Purnima 2023 Messages (PC - File Image)

धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पीपळाच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते. या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी आणि दूध अर्पण करणे शुभ मानले जाते.