IPL Auction 2025 Live

Buddha Purnima 2021: बुद्ध पौर्णिमा कधी आहे? तारीख, पूजा विधी, शुभ मुहूर्त, महत्त्व जाणून घ्या

असं म्हटलं जात की, महात्मा बुद्ध हे श्री हरि विष्णूचा नववा अवतार आहे.

Buddha Purnima 2021 (PC - File Image)

Buddha Purnima 2021: वैशाख पौर्णिमा 26 मे रोजी आहे. या दिवशी महात्मा बुद्धांचा जन्म झाला. म्हणून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. बुद्ध पौर्णिमेला स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी केलेले दान खूप फायदेशीर आहे. भगवान बुद्धांचा जन्म वैशाख महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. असं म्हटलं जात की, महात्मा बुद्ध हे श्री हरि विष्णूचा नववा अवतार आहे. हिंदूंव्यतिरिक्त बौद्ध धर्माचे लोक बौद्ध जयंती म्हणून बुद्ध पौर्णिमेला साजरे करतात. बुद्ध पौर्णिमा 25 मे 2021 रोजी मंगळवारी रात्री 08:30 पासून सुरू होईल आणि बुधवार 26 मे रोजी 04:43 वाजता संपेल.

यावर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शिव योग 10 ते 52 मिनिटांचा असेल. यानंतर सिद्ध योग सुरू होईल. ज्योतिषशास्त्रानुसार सर्वार्थ सिद्धि योग कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी शुभ आहे. कोणत्याही शुभ कार्यासाठी जर शुभ वेळ नसेल तर तो या योगाद्वारे केला जाऊ शकतो. असे मानले जाते की, या दोन शुभ योगाने केलेल्या कार्याचा परिणाम यशस्वी होतो. (June 2021 Shubh Muhurat: दुकान, कार्यालय आणि कारखान्याच्या उद्घाटनसाठी जून महिन्यातील 'या' तारखा ठरतील शुभ, वाचा सविस्तर)

सूर्य आणि चंद्र स्थिती

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्र वृश्चिक राशीत आणि सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल. या दिवशी, सूर्य नक्षत्र रोहिणी राहील, तर नक्षत्र पदे अनुराधा आणि ज्येष्ठ असतील.

या शुभ काळात दान आणि स्नान करा

ब्रह्मा मुहूर्ता पहाटे 03:45 ते पहाटे 04.35.

विजय मुहूर्ता दुपारी 02:22 या वेळेत दुपारी 03:16 या वेळेत आहे.

संध्याकाळी 06: 41 ते 07: 05 मिनिटांपर्यत गोधूलि मुहूर्त.

बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नानास विशेष महत्त्व आहे. या दिवशी कोणत्याही पवित्र नदीत स्नान केले जाते. यानंतर श्री हरि विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी धर्मराजाची उपासना करण्याची देखील मान्यता आहे. सत्यविनायक व्रताने धर्मराज प्रसन्न होतात, असा विश्वास आहे. धर्मराज मृत्यूचे देव आहेत, म्हणूनचं त्याचा आनंद अकाली मृत्यूची भीती कमी करतो. असे मानले जाते की, पौर्णिमेच्या दिवशी तीळ आणि साखर दान करणे शुभ आहे. या दिवशी साखर आणि तीळ दान केल्यामुळे पापांमधूनही मुक्तता मिळते.