Buddha Purnima 2019: बुद्ध जयंती दिवशी जाणून घ्या कसा होता सिद्धार्थ ते गौतम बुद्ध हा प्रवास

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म आणि महापरिनिर्वाण झाल्याने बौद्ध धर्मीयांमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व असते.

Buddha Purnima 2019 (File Photo)

Buddha Jayanti 2019: बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima) म्हणून साजरी केली जाते. यंदा 18 मे दिवशी जगभरात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्ध (Gautama Buddha) यांचा जन्म आणि महापरिनिर्वाण झाल्याने बौद्ध धर्मीयांमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व असते. सार्‍या संसारिक सुखाचा त्याग करून सिद्धार्थ म्हणजेच गौतम बुद्ध यांनी सत्याचा शोध घेण्यासाठी आपलं आयुष्य अर्पण केलं. मग यंदाच्या बुद्ध जयंतीच्या दिवशी जाणून घ्या राजकुमार सिद्धार्थ ते गौतम बुद्ध हा प्रवास नेमका कसा झाला? Buddha Purnima 2019 Wishes & Messages: बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा Greetings, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्रं!

गौतम बुद्ध यांच्या आयुष्याबद्दल काही रोचक गोष्टी

गौतम बुद्ध यांची जयंती वैशाख पौर्णिमेदिवशी साजरी  करतात.गौतम बुद्ध हे विष्णूचे 9 वे अवतार आहेत असादेखील समज आहे. त्यामुळे हिंदू धर्मीयदेखील यादिवशी मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात.