Bhaubeej Special Diwali Rangoli Designs: भाऊरायाच्या स्वागताला 'भाऊबीज स्पेशल' रांगोळ्या काढून दीपोत्सवातील शेवटचा सण आनंदात करा साजरा

भाऊरायाच्या स्वागताला रांगोळी काढून तुम्ही त्याचं स्वागत करण्याचा प्लॅन करत असाल तर पहा भाऊबीज विशेष काही सहजसोप्या रांगोळ्या

Bhai Dooj rangoli (Photo Credits: Instagram/festive.needs and YouTube/ DS Creation)

दिवाळीमध्ये भावा-बहीणीच्या नात्याचा गोडवा वाढवणारा एक सण म्हणजे भाऊबीज. यंदा 16 नोव्हेंबर दिवशी भाऊबीज (Bhaubeej) साजरी केली जाणार आहे. भारतीय संस्कृतीत दारामध्ये रांगोळी काढून पाहुण्याचं स्वागत करण्याची खास परंपरा आणि रीत आहे. भाऊबीजेला भाऊ बहीणीच्या घरी जाऊन जेवणाचा आनंद घेत ओवाळणी करून घेतो. त्यामुळे तुमच्या घरीदेखील भाऊरायाच्या स्वागताला रांगोळी काढून तुम्ही त्याचं स्वागत करण्याचा प्लॅन करत असाल तर पहा भाऊबीज विशेष काही सहजसोप्या रांगोळ्या (Bhaubeej Special Rangoli). नक्की वाचा:  Bhaubeej 2020 Shubh Muhurat: यंदा भाऊबीज दिवशी कोणत्या वेळेत कराल भावांची ओवाळणी; जाणून घ्या शुभ मुहूर्त!

कार्तिक शुक्ल द्वितीयेचा दिवस हा भाऊबीज आहे. या सणाच्या निमित्ताने भाऊ-बहीण एकमेकांना गिफ्ट देतात. कुटुंबासोबत एकत्र येऊन घराघरात दिवाळी सणाच्या शेवटच्या दिवशी आनंदाने या दीपोत्सवाची सांगता करतात. Easy Rangoli Ideas With Marigold Flowers: झेंडूच्या फुलांचा, पानांचा वापर करून झटपट कशी काढाल रांगोळी!

भाऊबीज विशेष रांगोळी

 

View this post on Instagram

 

A post shared by Art knack by Aditi (@art_knack_by_aditi_)

 

View this post on Instagram

 

A post shared by ❤️Yavatmal Navratri Official❤️ (@yavatmalnavratriofficial)

रांगोळीमध्ये विविध प्रकार आहेत. हिंदू धर्मातील काही शुभ लक्षणांचा आवर्जुन रांगोळीमध्ये समावेश केला जातो. त्यामुळे रांगोळीचा शोभा आणि शुभ संकेत वाढतात. दरम्यान संस्कार भारती रा6ग़ोळी, ठिपक्यांची रांगोळी यांच्यासोबतच तुम्ही पाना-फुलांचा वापर करून देखील खास रांगोळी काढू शकतात. झेंडू, शेवंती, गुलाब अशा रंगबेरंगी फुलांचा वापर करून तुम्ही यंदा दिवाळी पाडवा व भाऊबीजेला रांगोळी काढून या सणाचा आनंद द्विगुणित करू शकता.