Bhaubeej Gift Ideas For Brother: यंदा भाऊबीजेला आपल्या लाडक्या भावासाठी घ्या ‘हे’ खास गिफ्ट्स
तुम्ही अगदी कमी पैशात आपल्या भावाला खास गिफ्ट देऊ शकता. यंदा तुम्ही तुमच्या भावाला भाऊबीजेनिमित्त गिफ्ट घ्यायचा विचार करत असाल तर, तुम्हाला खालील गिफ्ट आयडिया नक्की उपयोगात येतील.
Bhaubeej Gift Ideas For Brother: दिवाळी (Diwali) हा सण प्रत्येकाला आवडणारा असा सण आहे. कारण, या दिवसात धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिपावली पाडवा आणि भाऊबीज (Bhaubeej) हे आनंदाचे उत्सव साजरे होतात. यातील बहीण-भावाचे नाते अधिक वृद्धिंगत करणारा सण म्हणजेचं भाऊबीज होय. या दिवशी प्रत्येक बहिणीला आपल्या भावाला भेटण्याची ओढ असते. या दिवशी बहिण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. तसेच भाऊ आपल्या बहिणीसाठी काहीतरी खास भेटवस्तू आणतो. आजकाल भाऊबीजेला बहीणीदेखील आपल्या भावाला भेटवस्तू देतात. तुम्ही अगदी कमी पैशात आपल्या भावाला खास गिफ्ट देऊ शकता. यंदा तुम्ही तुमच्या भावाला भाऊबीजेनिमित्त गिफ्ट घ्यायचा विचार करत असाल तर, तुम्हाला खालील गिफ्ट आयडिया नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा - Bhaubij Gift Ideas : ‘भाऊबीजे’ला बहिणीसाठी घ्या ‘हे’ खास गिफ्ट्स)
भाऊबीजेला भावाला द्या ह्या भेटवस्तू -
फिटनेस स्मार्ट बँड (Fitness Smart Band) -
प्रत्येक बहीणीला आपल्या भावाच्या आरोग्याची काळजी असते. मात्र, ती त्याची काळजी घेण्यासाठी नेहमी त्याच्यासोबत राहू शकत नाही. परंतु, तुमचा भाऊ जर फिटनेस फ्रिक असेल तर तुम्ही त्याला फिटनेस स्मार्ट बँड गिफ्ट म्हणून देऊ शकता. हे गिफ्ट त्याला नक्की आवडेल.
घड्याळ - Watches
भाऊबीजेनिमित्त तुम्ही आपल्या भावाला त्याच्या आवडत्या ब्रँडेड कंपनीचं घड्याळ देऊ शकता. विशेष म्हणजे त्याच्या आवडिच्या रंगाचं घड्याळ गिफ्ट म्हणून दिल्यास त्याला आणखी आनंद होईल. सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर घड्याळावर मोठा डिस्काऊंड देण्यात येत आहे.
वॉलेट (Leather Wallet) -
तुम्ही भाऊबीजेचं गिफ्ट म्हणून आपल्या भावाला वॉलेट देऊ शकता. वॉलेटमध्ये देखील खूप व्हराईटीज असतात. त्यामुळे तुम्ही आपल्या भावाच्या आवडत्या रंगाचं वॉलेट घेऊत ते त्याला गिफ्ट करू शकता. या वॉलेटमध्ये तुम्ही भावाला खर्चासाठी पॉकेटमनी दिले तर ते अतिउत्तम ठरेल आणि तुमचा भाऊ तुमच्यावर आणखी खूश होईल.
मोबाईल फोन -
सध्या अॅमेझॉन, फ्लिपकार्डवर मोबाईल फोनवर मोठी सुट मिळत आहे. त्यामुळे तुम्ही अगदी कमी पैशात चांगला स्मार्टफोन खरेदी करून तो आपल्या भावाला गिफ्ट करू शकता. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला अनेक व्हरिएंट उपलब्ध आहेत. तुमच्या भावाला फोटोची जास्त आवड असेल तर तुम्ही त्याला चांगला सेल्फी तसेच रिअर कॅमेरा असणारा स्मार्टफोन देऊ शकता.
जॅकेट -
तुमच्या भावाला जर जॅकेट घालण्याची आवड असेल तर तुम्ही त्याला ब्रँडेड जॅकेट गिफ्ट करू शकता. तुम्ही जर आपल्या भावाच्या आवडत्या रंगाचं जॅकेट घेतलं तर ते त्याला अधिक आवडेल आणि हे गिफ्ट त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरेल.
लॅपटॉप -
तुमचा भाऊ सध्या घरातून काम करत असेल तर तुम्ही त्याला लॅपटॉप गिफ्ट करू शकता. सध्या दिवाळी ऑफर्समध्ये लॅपटॉपवर खास सुट देण्यात येत आहे. हे गिफ्ट तुमच्या भावाला उपयोगी ठरू शकतं. हे गिफ्ट पाहून तुमच्या भावाला नक्की आनंद होईल. वरील सर्व गिफ्ट तुमची भाऊबीज अविस्मरणीय ठरवतील आणि बहीण-भावाच्या नात्यात अधिक गोडवा आणणारे ठरतील.