Raksha Bandhan 2024 Muhurt And Timing: रक्षाबंधनाच्या दिवशी 'इतके' तास असेल भद्रा कालावधी; 'या' शुभ मुहूर्तावर बांधू शकता राखी

राखी बांधल्यानंतर, भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो. तसेच नेहमी तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.

रक्षाबंधन 2024 शुभ मुहूर्त (फोटो सौजन्य - File Image)

Raksha Bandhan 2024 Muhurt And Timing: देशभरात 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan 2024) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या दिवसाची बहिणी वर्षभर मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. रक्षाबंधन हा केवळ सण नसून बहिणींचे अतूट बंध आणि प्रेम प्रतिबिंबित करतो. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात आणि त्याच्या कल्याणासाठी देवाकडे प्रार्थना करतात. राखी बांधल्यानंतर, भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो. तसेच नेहमी तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.

रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर बहिणींनी भावाला राखी बांधल्यास त्यांचे नाते अधिक घट्ट होते, अशी धार्मिक मान्यता आहे. यावेळी राखी बांधण्यासाठी 2 शुभ मुहूर्त आहेत. चला तर मग जाणून घेऊया रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काल कधी संपेल? राखी बांधण्याची सर्वोत्तम वेळ कधी असेल? (हेही वाचा -Rangoli Designs For Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनाच्या दिवशी घरासमोर, अंगणात, पाटाभोवती काढा 'या' सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन्स (Watch Video))

रक्षाबंधन 2024 भद्रा कालावधी -

हिंदू कॅलेंडरनुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा रात्री दीड वाजेपर्यंत राहील. 19 ऑगस्ट रोजी सकाळी 05:53 ते दुपारी 1:30 पर्यंत भद्रा असेल. भाद्रा सुमारे साडेसात तास चालेल. अशा परिस्थितीत 19 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1.30 वाजल्यापासून राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सुरू होईल. भद्रा काल हा काळ खूप अशुभ मानला जातो, त्यामुळे यावेळी राखी बांधू नका. भद्रामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. (हेही वाचा - Mehndi Designs For Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनासाठी हातावर काढा 'या' साध्या, सोप्या आणि काही मिनिटांमध्ये हटके लूक देणाऱ्या मेहंदी डिझाईन्स, पहा व्हिडिओ)

रक्षाबंधन शुभ मुहूर्त -

हिंदू कॅलेंडरनुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी राखीसाठी शुभ मुहूर्त दुपारी 1:30 ते रात्री 8:08 पर्यंत असेल. जर तुम्हाला दुपारी राखी बांधायची असेल तर दुपारचा मुहूर्त 1:43 ते 4:20 पर्यंत असेल. याशिवाय रक्षाबंधनाच्या दिवशी संध्याकाळी प्रदोषकाळात भावांना राखी बांधता येते. प्रदोष कालचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 6:56 ते रात्री 9:08 पर्यंत असेल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे. त्यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. लेटेस्टली मराठी यातील कोणत्याही गोष्टीच्या सत्यतेचा पुरावा देत नाही.)