Akshaya Tritiya 2022: अक्षय्य तृतीयेला सोन्याचे नाणे खरेदी करण्यापूर्वी 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा होईल मोठं नुकसान
म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोन्याचे नाणे खरेदी करण्याअगोदर खास पाच गोष्टी सांगणार आहोत. याचा पडताळा करूनचं तुम्ही अक्षय तृतीयेला सोने खरेदी करू शकता.
Akshaya Tritiya 2022: अनेकांना सोन्यात गुंतवणूक करायला आवडते. दिवाळी, धनत्रयोदशी आणि अक्षय्य तृतीया यांसारख्या प्रसंगी ते सोन्याची खरेदी करतात. यंदा अक्षय्य तृतीया 3 में ला म्हणजेचं उद्या आहे. त्यामुळे बरेच लोक सोने खरेदी करण्याचा विचार करत असतील. वास्तविक, अक्षय्य तृतीया हा सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त मानला जातो. या प्रसंगी सोने खरेदी करणे नशीब आणि समृद्धीशी संबंधित आहे.
तथापि, जर तुम्ही या निमित्ताने सोन्याची नाणी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही काही गोष्टी लक्षात घेऊन हे पाऊल उचलले पाहिजे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोन्याचे नाणे खरेदी करण्याअगोदर खास पाच गोष्टी सांगणार आहोत. याचा पडताळा करूनचं तुम्ही अक्षय तृतीयेला सोने खरेदी करू शकता. (हेही वाचा - Akshaya Tritiya 2022: अक्षय्य तृतीया कधी आहे? तारीख, वेळ, शुभ मुहूर्त, पूजा मुहूर्त आणि Akha Teej चा शुभ दिवस साजरा करण्याचे महत्त्व काय? जाणून घ्या)
सोन्याची शुद्धता -
सोन्याची शुद्धता ही नाणी किती चांगली आहे हे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. अचूकता कॅरेटने मोजली जाते. जर तुमचे सोन्याचे नाणे 24 कॅरेटचे असेल तर याचा अर्थ नाण्याच्या 24 भागांपैकी 24 भाग सोन्याचे आहेत. 22 कॅरेट सोन्याच्या नाण्यांमधील 24 पैकी 22 भाग सोन्याचा आहेत. तर उर्वरित दोन भाग इतर कोणत्यातरी धातूचे आहेत.
हॉलमार्क -
हॉलमार्किंग भारतीय मानक वैशिष्ट्यांनुसार सोन्याच्या नाण्याची शुद्धता सुनिश्चित करते. सोन्याच्या वस्तूंची शुद्धता आणि सूक्ष्मता निश्चित करण्यासाठी बीआयएस (ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स) हॉलमार्किंग सेंटरमध्ये त्यांची चाचणी आणि प्रमाणित केले जाते. सोन्याची नाणी विकत घेण्यापूर्वी हॉलमार्किंगचे चिन्ह नक्कीच तपासा.
वजन -
सोन्याचे नाणे विकत घेण्यापूर्वी, त्याचे वजन विचारा. तुम्ही उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांमधून नाण्याची निवड करू शकता. सर्वात सामान्य 1 ग्रॅम, 5 ग्रॅम आणि 10 ग्रॅम नाणी आहेत. सोन्याची नाणी 0.5 ग्रॅम ते 50 ग्रॅमच्या श्रेणीत येतात.
मेकिंग चार्ज -
तुम्ही हे देखील लक्षात घेतले पाहिजे की, दागिन्यांच्या तुलनेत सोन्याची नाणी खरेदी करणे तुलनेने सोपे आहे. कारण, नाण्यांच्या स्वरूपात तुम्ही कमीत कमी मेकिंग चार्जेससह किमान 0.5 ग्रॅम सोने खरेदी करू शकता. कारण सोन्याची नाणी बनवण्यासाठी कमी कारागिरी लागते.
पुनर्विक्री -
आरबीआयच्या आदेशानुसार, जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही बँकेकडून सोन्याची नाणी खरेदी केली तर ती त्याला बँकेला विकता येणार नाही. ज्यांना त्यांची सोन्याची नाणी विकायची आहेत त्यांनी त्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म किंवा मान्यताप्राप्त ज्वेलर्स शोधावे लागतील.