Bail Pola 2021: आज कर्नाटकी बेंदूर; यंदा महाराष्ट्रात बैलपोळा आणि बेंदूर कधी ? जाणून घ्या महत्व
महाराष्ट्रीय बेंदूर सणाच्या आगोदर हा सण राज्यातील काही भागात साजरा होतो. बेंदूर (Bendur 2021) हा सण मध्य आणि दक्षिण भारतातील कर्नाटक (Karnatak), छत्तीसगड (Chhatisgarh), महाराष्ट्र (Maharashtra) आणि मध्य प्रदेश (Madhya Pradesh) या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
Importance & Date Of Bendur 2021: आज कर्नाटकी बेंदूर (Karnataki Bendur) हा सण साजरा केला जात आहे. हा सण महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रीय बेंदूर सणाच्या आगोदर हा सण राज्यातील काही भागात साजरा होतो. बेंदूर (Bendur 2021) हा सण मध्य आणि दक्षिण भारतातील कर्नाटक (Karnatak), छत्तीसगड (Chhatisgarh), महाराष्ट्र (Maharashtra) आणि मध्य प्रदेश (Madhya Pradesh) या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बेंदूरच्या प्रसिद्ध सणाला अनेक ठिकाणी बैलपोळा (Bailpola) म्हणून संंबोधले जाते. (Karnataki Bendur 2021 HD Images: कर्नाटकी बेंदूर सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी एचडी इमेज, WhatsApp Status, Wishes, Facebook Messages इथून करु शकता डाऊनलोड)
कर्नाटक मध्ये जुन महिन्यातील पौर्णिमेला तर महाराष्ट्रात साधारण ऑगस्ट मध्ये हे सेलिब्रेशन होते. आजही महाराष्ट्र-कर्नाटक सीमारेषेवरील कोल्हापुर सहित काही गावांमध्ये बेंदूर साजरा केला जात आहे. यंदा महाराष्ट्रात बैलपोळा आणि बेंदूर कधी ? ते जाणून घेऊयात.
बेंंदुर सणाचे महत्व
महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील काही भागात उदा. कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो. हा सण वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असतो.या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून विश्रांती दिली जाते. बैलांना सजवून मिरवणुका काढल्या जातात.या दिवशी गावाच्या सीमेजवळच्या शेतावर (आखरावर) आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. या सणादिवशी खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. या दिवशी बैलांना आराम दिला जातो, साधरणतः नांगराला जुंपलेला बैल या दिवशी खास आंघोळ घालून, रंगीत झालर लावून, शिंग रंगवून सजवला जातो, त्याला गोडाधोडाचे जेवण दिले जाते, त्याची पूजा केली जाते.
यंदा बैलपोळा कधी?
संपूर्ण महाराष्ट्रात सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला बेंदुरच्या स्वरुपातील बैलपोळा साजरा केला जातो. यंदा महाराष्ट्रीय बेंदूर 22 जुलै आणि बैल पोळा 6 सप्टेंबर साजरा केला जाणार आहे. शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो.