Ashadhi Wari 2025: आषाढी वारी मध्ये आज पैठण मधून संत एकनाथांच्या पालखीचे प्रस्थान; 120 किलो शुद्ध चांदीचा रथ सज्ज
आज गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नाथांच्या पालखी ओटा येथून पालखी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान सहाच्या सुमारास होणार आहे.
Sant Eknath Maharaj Palkhi Prasthan: यंदा आषाढी एकादशी साठी वैष्णवांचा मेळा पंढरपूरच्या दिशेला निघाला आहे. आज देहू मधून संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबतच पैठण मधून संत एकनाथांची पालखी प्रस्थान ठेवणार आहे. या पालखी प्रस्थान मध्ये 120 किलो शुद्ध चांदीचा रथ सज्ज करण्यात आला आहे. सुरेख नक्षीकाम करण्यात आले आहे. तर या 110 घनफूट सागवानी लाकडाचा वापर करण्यात आला आहे.या रथामधून आज संध्याकाळी पालखीचं प्रस्थान होणार आहे. नाथपादुकांची पालखी यावर्षीपासून चांदीच्या रथातून पंढरपूरपर्यंत नेली जाणार आहे.
आज गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नाथांच्या पालखी ओटा येथून पालखी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान सहाच्या सुमारास होणार आहे. तत्पूर्वी एकनाथांच्या पालखी सोहळ्यातील पादुकांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.
संत एकनाथ महाराजांच्या 120 किलोच्या नूतन चांदीच्या पालखी रथाचे पूजन संपन्न
श्रीमंत संत एकनाथ महाराजांच्या १२० किलोच्या नूतन चांदीच्या पालखी रथाचे पूजन व भव्य मिरवणूक सोहळा यशस्वीरित्या पार पडला!
श्री क्षेत्र पैठण येथे पार पडलेला हा अध्यात्मिक, पारंपरिक आणि भक्तिभावाने नटलेला सोहळा सर्वांच्या मनावर अमीट ठसा उमटवून गेला. शेकडो नाथभक्तांच्या उपस्थितीत,… pic.twitter.com/hYaPcAKkmL
— Sandipan Bhumare (@SandipanBhumare) June 17, 2025
संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा मुक्काम आणि प्रवास
पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम पैठण हद्दीतील चनकवाडी या गावी राहणार आहे. यामध्ये 19 जूनला हदगाव, २० जूनला कुंडलपारगाव, 21 जूनला मुंगसवाडे, 22 जूनला राक्षसभुवन, 23 जूनला रायमोह, 24 जूनला पाटोदा, 25 जूनला दिघोळ, 26 जूनला खर्डा, 27 जूनला दांडेगाव, 28 जूनला अनाळे, 29 जूनला परांडा, 30 जूनला बिटरगाव, 1जुलैला कुर्डू, 2 जुलैला अरण,3 जुलैला करकंब, 4 जुलैला होळे इथे मुक्काम राहणार आहे. 5 जुलैला पालखी पंढरपूर मध्ये असणार आहेत.
दरम्यान आज दुपारी दोन वाजता देहू मधून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. उद्या आळंदी मधून ज्ञानोबांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. यापूर्वी संत निवृत्तीनाथांची पालखी नाशिक मधून पंढरीकडे निघाली आहे. आता वारकर्यांना पायी वारी करत विठू माऊलींच्या दर्शनाची ओढ लागली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2025 12:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

