Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2025: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज देहू नगरी मधून प्रस्थान
आज संत तुकारामांनंतर उद्या 19 जून दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आहे. गुरूवारच्या नियमित पूजा अर्चनेनंतर रात्री 8 वाजता यंदा पालखीचा प्रस्थान सोहळा होणार आहे.
Pandharpur Ashadhi Wari 2025: आषाढी एकादशीसाठी आज जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे (Sant Tukaram Maharaj's 340th Palkhi Procession) आज प्रस्थान होणार आहे. दुपारी अडीजच्या सुमारास देहू (Dehu) नगरी मधून वैष्णवांचा मेळा पंढरपूरच्या दिशेला निघणार आहे. आषाढी वारी मधील मानाच्या दिंडींमध्ये संत तुकोबा रायांच्या पालखीचा समावेश आहे. या प्रस्थान सोहळ्याला अनेक मान्यवर देखील हजेरी लावणार आहेत. ज्या विठू माऊलींच्या भक्तांना आज पंढरपूर नगरी मध्ये जाऊन पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी होता येणार नाही त्यांच्यासाठी सोशल मीडीया मध्येही हा सोहळा लाईव्ह पाहता येणार आहे.
यंदा संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे 340 वे वर्ष आहे.देहूच्या देऊळवाड्यातून पालखी पंढरपूरच्या दिशेने निघणार आहे. 6 जुलै 2025 दिवशी साजर्या होणार्या आषाढी एकादशी ला विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन घेण्याचे वेध वारकरी मंडळींना लागले आहेत.
संत तुकारामाच्या पालखी सोहळ्यामध्ये चालत हजारो वारकरी पंढरीकडे निघतात. त्यामध्ये उभे रिंगण, गोल रिंगण यांचे देखील मोठे आकर्षण असते. 10 जुलै दिवशी तुकोबांच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. नक्की वाचा: Pandharpur Wari 2025 Sant Tukaram Maharaj Palkhi Time Table: संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा कसा असेल? पहा रिंगण सोहळा, मुक्कामांचा संपूर्ण कार्यक्रम.
इथे पहा संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा
संत तुकारामांच्या पालखीचे वेळापत्रक
आज संत तुकारामांनंतर उद्या 19 जून दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आहे. गुरूवारच्या नियमित पूजा अर्चनेनंतर रात्री 8 वाजता यंदा पालखीचा प्रस्थान सोहळा होणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2025 08:51 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

