Ashadhi Ekadashi 2024 HD Images In Marathi: आषाढी एकादशी निमित्त खास Wishes, Whatsapp Status, Greetings च्या माध्यमातून द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा
गेल्या आठशे वर्षांपासून अधिक काळ ही वारीची प्रथा चालू आहे. वारकरी संप्रदायात केली जाणारी पंढपूरची वारी हादेखील एक साधनामार्गच आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेच्या नदीत स्नान करुन विठ्ठालचे दर्शन घेण्याला अधिक महत्त्व आहे.
Ashadhi Ekadashi 2024 HD Images In Marathi: पांडुरंगाची भक्ती आणि पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची शेकडो वर्षांची अध्यात्मिक, भक्ती परंपरा आहे. आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi 2024) दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी आपली वारी घेऊन पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. वषर्भरातील 24 एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. आज, 17 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होत आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. ही तिथी वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. असे मानले जाते की, आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. या दिवशी केलेल्या साधनेपासून होणारा लाभ हा सर्वाधिक असतो.
आषाढी एकादशीला पंढरपूरला राज्यभरातून वाऱ्या येतात. गेल्या आठशे वर्षांपासून अधिक काळ ही वारीची प्रथा चालू आहे. वारकरी संप्रदायात केली जाणारी पंढपूरची वारी हादेखील एक साधनामार्गच आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेच्या नदीत स्नान करुन विठ्ठालचे दर्शन घेण्याला अधिक महत्त्व आहे.
अशा या आषाढी एकादशी निमित्त खास Whatsapp Status, Wishes, Images, Greetings द्वारे द्या विठ्ठलभक्तांना शुभेच्छा.
(हेही वाचा: Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशी निमित्त उपवासासाठी बनवा 'हे' झटपट पदार्थ)
दरम्यान, पौराणिक कथांनुसार या महान एकादशीच्या दिवशी, भगवान विष्णू झोपी गेले आणि चार महिन्यांनंतर कार्तिक महिन्यात येणाऱ्या प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी ते पुन्हा जागे झाले. हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो. शयनी एकादशी म्हणजे चातुर्मासाला सुरुवात होते. या काळात भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केला जातो.