Ashadhi Ekadashi 2019 Vrat: आषाढी एकादशी दिवशी व्रत करणार आहात? 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा
याचप्रमाणे कार्तिकात येणारी एकदशी सुद्धा मोठी म्हणून गणली गेलेली आहे. वर्षातील सणांचा चार महिन्याचा एक कालखंड सुरू होतो ज्याला चातुर्मास (चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल 11 ला होतो व कार्तिक शुक्ल 11 ला चातुर्मास संपतो) असे म्हणतात.
Devshayani Ekadashi 2019: आषाढ शुद्ध एकादशीला (Ashadhi Ekadashi) 'महाएकादशी' असे नाव आहे. याचप्रमाणे कार्तिकात येणारी एकदशी सुद्धा मोठी म्हणून गणली गेलेली आहे. चातुर्मासाचा (Chaturmas) आरंभ आषाढ शुक्ल 11 ला होतो व कार्तिक शुक्ल 11 ला चातुर्मास संपतो म्हणून या एकादशीला महत्व आहे. या एकादशीला 'शयनी' एकादशी (Devshayani Ekadashi) असेही नाव आहे.'शयन' म्हणजे झोप. आजपासून भगवान विष्णू हे क्षीरसागरातील शेषावर चार महिने झोपतात. या चार महिन्याच्या झोपेत ठीक दोन महिन्यांनी ते कुशीवर वळतात म्हणून भाद्रपदातील एकादशीला 'परिवर्तनी एकादशी' असे म्हणतात. चार महिन्यानंतर त्यांना जाग येणार म्हणून कार्तिकी एकादशीला 'प्रबोधिनी एकादशी' असे म्हणतात.
आषाढ हा महिना पचन बिघडवणारा असतो म्हणून येत्या चार महिन्यात अनेक तर्हेचे उपास, नक्त, एकभुक्त, काही व्रत कैवल्ये ही उपवासाच्या दृष्टीने आयोजित केलेली आहेत. धार्मिक वृत्तीची माणसे हे चार महिने व्रतस्थ राहतात. चातुर्मासातील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात. हिंदु धर्मातील हा विज्ञानवादी दृष्टीकोन अत्यंत प्रगल्भ असा आहे. तो पाळण्याचा प्रयत्न केला तर प्रकृतीमान उत्तम राहते. तर जाणून घ्या एकादशी व्रत करताना या गोष्टी जरुर लक्षात ठेवा.
-एकादिवशीच्या वेळी मांस, लहसूण, कांदा, मसूर डाळ या गोष्टी खाणे टाळा.
-तसेच रात्रभर श्री भगवान विष्णुची पूजेत मग्न रहावे.
-सकाळी लिंबू किंवा आंब्याचे पान खावे. कारण या दिवशी झाडाचे पान तोडणे वर्जित असते. मात्र झाडावरुन स्वत:हून खाली पडलेले पान खाल्ल्यास उत्तम.
-या दिवशी कोणाच्या भावना दुखावणार नाही याची काळजी.
- सौभाग्यवती महिलांनी उपवास ठेवल्यास त्यांनी फळांचे सेवन करावे.
या दिवशी श्री विष्णूची श्रीधर ह्या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावतात. नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप, तुलसी अर्चन, विष्णू सहस्त्रनाम पाठ, ज्ञानदेवांचा हरिपाठ, भजन, कीर्तन, आदि करण्याचा प्रघात आहे. या दिवशी सात्विक आहार घ्यावा, शक्यतो केवळ फलाहार व दूध एवढेच घ्यावे. काही लोक तर निर्जला उपवास करतात म्हणजे पाण्याचा थेंबही न पिता उपवास. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. दिवसभर भगवंताच्या सान्निध्यात राहणे म्हणजेच उपवास होय.