Anganewadi Bharadi Devi Jatra 2022 Guidelines: आंगणेवाडी भराडी देवीच्या 24 फेब्रुवारीला होणार्‍या यात्रेवर कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 'हे' आहेत यंदा नियम

तळकोकणातील महत्त्वाच्या असलेल्या आंगणेवाडी भराडी देवी जत्रेला अनेक चाकरमनी हमखास हजेरी लावतात.

Representational Image (Photo Credits: PTI)

मागील दोन वर्ष कोरोना संकटामुळे कोणताच धार्मिक सण मोठ्या उत्साहात साजरा झालेला नाही. पण आता कोविड 19 चं संकट आटोक्यात आल्याची चिन्हं असल्याने काही प्रमाणात निर्बध हटवण्यास सुरूवात झाली आहे. याला यंदा आंगणेवाडीची भराडी देवी जत्रादेखील (Anganewadi Bharadi Devi Jatra) अपवाद नाही. मागील 2 वर्ष भाविकांशिवाय पार पडलेल्या या जत्रेमध्ये यंदा भाविकांची उपस्थिती बघायला मिळणार आहे. तळकोकणातील महत्त्वाच्या असलेल्या आंगणेवाडी भराडी देवी जत्रेला अनेक चाकरमनी हमखास हजेरी लावतात. त्यासाठी रेल्वे कडूनही खास सोय करण्यात आली आहे. कोकण रेल्वेने भराडी देवी जत्रेसाठी विशेष रेल्वे सेवा देखील चालवण्यास सुरूवात केली आहे. मग यंदा तुम्ही देखील या जत्रेमध्ये सहभागी होणार असाल तर जाणून घ्या प्रशासनाने कोविडच्या पार्श्वभूमीवर घातलेले निर्बंध काय असतील?

भराडी देवी यात्रा 2022 नियमावली काय?

(नक्की वाचा: यंदा आंगणेवाडीच्या भराडीदेवी जत्रेला तुम्ही मालवण मध्ये कसे पोहचाल?)

मागील दोन वर्ष भाविक आणि देवी यांची ताटातूट झाल्याने यंदा अनेकजण दर्शनाला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंदाजे 4-5 लाख भाविक दर्शनाला येतील असा अंदाज आहे. एसटी बस संपाचा भाविकांना फटका बसू नये म्हणून देखील विशेष खबरदारी घेतली जात आहे.