Anganewadi Bharadi Devi Jatra 2019: आंगणेवाडी 2019 यात्रेसाठी मुंबई, पुणे येथील भाविकांसाठी मध्य रेल्वे चालवणार 10 विशेष ट्रेन्स, 16 फेब्रुवारीपासून बुकिंग होणार सुरू
16 फेब्रुवारीपासून या आंगणेवाडी विशेष ट्रेनचं बुकिंग सुरू केले जाणार आहे.
Anganewadi Bharadi Devi Jatra 2019 Special Trains: कोकणवासियांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख असणारी आंगणेवाडीच्या भराडीदेवीची यात्रा (Anganewadi Bharadi Devi ) 25 फेब्रुवारी 2019 दिवशी होणार आहे. अवघ्या दीड दिवसाच्या असणार्या या जत्रेमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईसह देशा-परदेशातून भाविक येतात. मुंबई, पुणे येथून कोकणात यात्रेला येण्यासाठी मध्य रेल्वेकडून आंगणेवाडी जत्रेकरिता 10 विशेष गाड्या
चालवण्यात येणार आहेत. 16 फेब्रुवारीपासून या आंगणेवाडी विशेष ट्रेनचं बुकिंग सुरू केले जाणार आहे.
सीएसएमटी - करमाळी, पुणे - सावंतवाडी, लोकमान्य टिळक रोड- सावंतवाडी, सावंतवाडी पनवेल या मार्गावर विशेष रेल्वे सेवा चालवण्यात येणार आहे. कोकणात जाणार्या इतर रेल्वेचं तिकीट बुकिंग 4 महिने आधीपासून सुरू करण्यात आलं आहे. Anganewadi Bharadi Devi Jatra 2019: आंगणेवाडी भराडी देवी जत्रा 2019 यंदा 25 फेब्रुवारीला भरणार!
IRCTC च्या अधिकृत वेबसाईटसह, UTS APP च्या माध्यमातूनही ऑनलाईन तिकीट बुकिंग करण्याची सोय देण्यात आली आहे. रेल्वेप्रमाणेच राज्य परिवहन मंडळाकडूनही आंगणेवाडी विशेष बस सेवा चालवली जाणार आहे.