Ambedkar Jayanti 2020 Wishes: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मराठामोळे Messages, Wishes, Greetings शेअर करून साजरी करा यंदा भीम जयंती!

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, मेसेजेस यांच्यामाध्यमातून तुम्ही नक्कीच जगभरात विखुरलेल्या भीम अनुयायींना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी ग्रीटींग्स

Bhim Jayanti 2020 Wishes | File Photo

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2020 Marathi Wishes: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा 129 वी जयंती आहे. 14 एप्रिल हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. BR Ambedkar) यांचा जन्म दिवस भीम जयंती (Bhim Jayanti) म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. दरवर्षी 14 एप्रिलला भीम अनुयायी दलितांचे आधारवड असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात. यंदा महाराष्ट्रासह भारतात आणि किंबहुना जगभरात कोरोनाचं सावट असल्याने यंदाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ही सार्वजनिक स्वरूपात साजरी न करता अत्यंत साधेपणाने घरगुती स्वरूपातच साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भीम जयंती निमित्त तुम्ही लोकांना थेट भेटू शकत नसलात तरीही आज बाबासाहेबांचा विचार पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी, भीम अनुयायींना एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp), फेसबूक (Facebook), ट्वीटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम, हाईल असे अनेक पर्याय खुले आहेत. व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, मेसेजेस यांच्यामाध्यमातून तुम्ही नक्कीच जगभरात विखुरलेल्या भीम अनुयायींना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता.(Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2020 Messages: आंबेडकर जयंती निमित्त मराठी संदेश, Wishes, Greetings, Whatsapp Stickers, Images च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वर शेअर करून द्या भीम जयंतीच्या शुभेच्छा!)

1928 पासून आंबेडकर जयंती साजरी करण्याला सुरूवात झाली. भीम जयंतीचं सेलिब्रेशन 1928 साली जनार्दन रणपिसे यांनी सुरू केलं. समाजात शोषित घटकांना अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्याची, संघटीत होण्याची प्रेरणा मिळाली. हळूहळू भीम जयंतीचा सोहळा गावातून सुरू होऊन शहरात आणि आज परदेशात पोहचला आहे. पण यंदा सोहळा प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून नव्हे तर घरात आणि व्हर्च्युअल जगात साजरा करायचा आहे. मग यंदाच्या भीमजयंतीच्या शुभेच्छा ग्रीटिंग्स, मेसेजेस, विशेस, Images च्या माधयमातून भीम अनुयायींपर्यंत पोहचवण्यासाठी ही खास मराठमोळी शुभेच्छापत्रं!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा!

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

BR Ambedkar Jayanti 2020| File Photo

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

BR Ambedkar Jayanti 2020| File Photo

निळ्या रक्ताची धमक बघ

स्वाभिमानाची आग आहे

घाबरू नकोस कुणाला

तू भीमाचा वाघ आहेस

जय भीम !

BR Ambedkar Jayanti 2020| File Photo

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त

सर्व भीम अनुयायींना हार्दीक शुभेच्छा!

BR Ambedkar Jayanti 2020| File Photo

तू जीवन दिधले मातीला गंधाचे

दलितांच्या दीपा तुला प्रणाम अवघ्या विश्वाचे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर  जयंतीच्या शुभेच्छा!

BR Ambedkar Jayanti 2020| File Photo

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू येथे झाला. दलित, अस्पृश्य समाजातील लोकांना त्यांचे न्याय वा हक्क मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोलाची कामगिरी केली आहे. 2017 सालपासून महाराष्ट्रामध्ये 14 एप्रिल हा दिवस ‘ज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या विचारांचा, शिकवणीचा वसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी त्यांनी आंबेडकर जयंती हा एक महत्त्वाचा दिवस आहे. परंतू यंदा अवघं जग कोरोना व्हायरसच्या जागतिक आरोग्य संकटाचा सामना करत असताना हे सेलिब्रेशन यंदा सामुहिकरित्या एकत्र येऊन न करता वैयक्तिक पातळीवर करण्याची गरज आहे.