Ambedkar Jayanti 2019: आंबेडकर जयंती निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिल्या खास शुभेच्छा!
आंबडेकर जयंती निमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येलाच देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: आज 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B.R. Ambedkar Jayanti) यांची 128 वी जयंती. आंबेडकर जयंती संपूर्ण देशभरात अगदी उत्साहाने साजरी केली जाते. आंबडेकर जयंती निमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांनी आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येलाच देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आंबेडकर जयंती’ चं सेलिब्रेशन 1928 पासून सुरू झालं; कोणी आणि कशी सुरू केली भीम जयंती?
शुभेच्छा देताना राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, "आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने भारताच्या संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा. डॉ. आंबडेकर आमच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक उत्कृष्ट नेते होते आणि त्यांनी समाजातील दलित आणि वंचित वर्गातील लोकांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांचे व्यक्तिमत्त्व असाधारण होते. विद्वान, शिक्षाविद्य, कायदेपंडीत, समाजसुधारक आणि राजकीय नेते असलेल्या डॉ. आंबेडकरांचे जीवन हे साहस आणि दृढ विश्वासाचा एक प्रेरणादायी मार्ग आहे." डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, WhatsApp Status आणि शुभेच्छापत्रं!
पुढे ते म्हणाले की, "दलित, वंचित वर्ग, शेतकरी, श्रमिक आणि विशेषतः महिला यांना समान अधिकार, सन्मान मिळवून देणाऱ्या समाजाचे स्वप्न डॉ. आंबेडकर यांनी पाहिले होते. ते लोकतांत्रिक, शांतिपूर्ण, अहिंसहक आणि सामंजस्यपूर्ण साधनांच्या माध्यामातून हे स्वप्न सत्यात उतरवणारे एक समर्थ नेते होते. त्यांनी समाजाला दाखवलेला मार्ग करुणा, समानता या भावना दृढ करणारा होता. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण आंबेडकर यांच्या विचार आणि जीवनातून काही खास गोष्टी शिकुया आणि त्याचे पालन करण्याचा संकल्प करुया."
रामनाथ कोविंद यांचे ट्विट:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आंबेडकर जयंती निमित्त खास शुभेच्छा दिल्या. संविधानाचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे प्रणेता डॉ. भीमराव आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सादर नमन. जय भीम, असे लिहित मोदींनी ट्विटरवर खास व्हिडिओ शेअर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट:
ANI ट्विट:
आंबेडकर जयंती निमित्त अनेक दिग्गांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी देखील यांना श्रद्धांजली अर्पण करतात. या दिवशी देशभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन केले जाते.