Amarnath Aarti 2021 Live Streaming and Timing: यंदाही रद्द झाली 'अमरनाथ यात्रा'; जाणून घ्या कुठे व कधी पाहू शकाल आरतीचे थेट प्रक्षेपण

देशातील महत्वाच्या यात्रेंपैकी ही एक यात्रा मानली जाते. आता भाविकांसाठी बाबा अमरनाथांच्या पवित्र गुहेतून आरतीचे थेट प्रक्षेपण व दर्शन (Amarnath Aarti 2021 Live Streaming) आजपासून सुरू होणार आहे.

Amarnath Cave Shrine (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) मागच्यावर्षी प्रमाणे यंदाही बाबा अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra 2021) रद्द करण्यात आली असून प्रतीकात्मक यात्रा होणार आहे. देशातील महत्वाच्या यात्रेंपैकी ही एक यात्रा मानली जाते. आता भाविकांसाठी बाबा अमरनाथांच्या पवित्र गुहेतून आरतीचे थेट प्रक्षेपण व दर्शन (Amarnath Aarti 2021 Live Streaming) आजपासून सुरू होणार आहे. यात्रा सुरु होण्याच्या आदल्या दिवशी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि श्राईन बोर्डाचे अधिकारी यांनी पवित्र गुहेत पूजा-अर्चना केली. बालटाल मार्गावरून प्रशासन व पोलिसांचे अधिकारी पवित्र गुहेत पोहोचतील.

आजपासून ते 22 ऑगस्टपर्यंत सकाळी 6 ते 6.30 आणि सायंकाळी 5 ते 5.30 या वेळेत अर्ध्यातसाठी आरती ठेवण्यात येणार आहे. श्री अमरनाथ जी यांच्या वेबसाइट आणि अ‍ॅपवर त्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. तसेच यासाठी दूरदर्शनने (Doordarshan) लाईव्ह स्ट्रिमिंग सुरु केले आहे, ज्याद्वारे हिमायातील पवित्र गुफेचे लाइव्ह ब्रॉडकास्ट केले जाणार आहे.

श्री अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष व लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी कोरोनामुळे श्री अमरनाथ यात्रा रद्द करण्याची घोषणा करताना सांगितले की, जनतेचे प्राण वाचवण्यासाठी यात्रा रद्द करण्यात आली आहे. परंतु लवकरच सर्व धार्मिक क्रिया पूर्वीप्रमाणे पवित्र गुहेत होऊ शकतील.

यंदा जरी यात्रा होत नसली तरी, दोन महिने प्रशासकीय व पोलिस अधिकाऱ्यांसह सुरक्षा दलांना याठिकाणी तैनात केले जाणार आहे. पवित्र गुहेत 56 दिवस पूजा केली जाणार आहे. शेवटचे दर्शन 22 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी केले जाईल, ज्यासह ही यात्रा संपेल. (हेही वाचा: घरगुती गणपतीची मूर्ती 2 फूटांची असावी; 'गणेशोत्सवा'साठी राज्य सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना)

दरम्यान, भगवान भोलेनाथ यांच्या प्रसिद्ध अमरनाथ गुहेचा संदर्भ त्या पौराणिक कथेशी आहे, जिथे भगवान शिव यांनी माता पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगितले होते. या कारणास्तव, ही गुहा अमरनाथची गुहा म्हणून ओळखली जाते. आजही दरवर्षी बाबा अमरनाथ आपल्या भक्तांना नैसर्गिक हिम शिवलिंगाच्या रूपात दर्शन देतात. ज्यासाठी बाबा अमरनाथांच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी या ठिकाणाला भेट देतात.