Akshay Tritiya 2021: यंदा अक्षय्य तृतीया कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्तासह पूजा विधी

कारण या दिवशी अक्षय्य तृतीया आणि भगवान परशूराम यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा अक्षय्य तृतीया येत्या 14 मे 2021 रोजी साजरी केली जाणार आहे.

अक्षय्य तृतीया (Photo Credits: Wikimedia Commons)

Akshay Tritiya 2021: वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीया तिथीला हिंदू धर्मात अधिक महत्व आहे. कारण या दिवशी अक्षय्य तृतीया आणि भगवान परशूराम यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा अक्षय्य तृतीया येत्या 14 मे 2021 रोजी साजरी केली जाणार आहे. ती तिथी अत्यंत पवित्र मानली जाते. तर पापांचे विनाश करणारी आणि सुख देणारी ही तिथी असल्याचे म्हटले जाते. या दिवशी लोक सोन, चांदी आणि अन्य वस्तूंची खरेदी करतात. त्याचसोबत भगवान विष्णू, परशुराम आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.(Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीया सण महाराष्ट्रासहित भारतातील विविध भागात कसा साजरा केला जातो? जाणून घ्या)

अक्षय्य या दिवसाचा अर्थ कधीही क्षय न पावणारे म्हणजेच नाश न पावणारे. म्हणूनच या दिवशी दानाचं विशेष महत्त्व असते. या दिवशी दिलेले कोणतचं दान क्षयाला जात नाही अशी मान्यता आहे. तर जाणून घ्या अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तासह पूजा विधी बद्दल अधिक.(Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीया दिवशी काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या)

>>अक्षय्य तृतीया शुभ मुहूर्त

-अक्षय्य तृतीया तिथी आरंभ: सकाळी 05 वाजून 38 मिनिटे

-अक्षय्य तृतीया तिथी समाप्ती: सकाळी 07 वाजून 59 मिनिटे.

>>अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 5 वाजून 38 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपर्यंत

>>अक्षय्य तृतीया सणाचे महत्व

जाणकारांच्या मते अक्षय्य तृतीयेचा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य मुहूर्त पाहून केले जाते. या दिवशी पुण्य केल्यास अक्षय्य फळाची प्राप्ती होते. तसेच लोक सोने चांदीची खासकरुन खरेदी केली जाते. असे म्हणतात की, या दिवशी खरेदी करण्यात आलेल्या एखाद्या गोष्टीत नेहमीच वाढ होत राहते. तसेच सोने खरेदी केल्यास सुख-समृ्द्धी येते. या शुभ तिथी दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यास घरात धन-धान्याची वाढ होते. भगवान परशुराम यांचा सुद्धा या दिवशी जन्म झाला होता. त्यामुळे त्यांची सुद्धा अक्षय्य तृतीयेला पूजा केल्यास विशेष फळ मिळते.

>>अक्षय्य तृतीया पूजा विधी

या दिवशी महिला आपल्या परिवाराच्या समृद्धीसाठी व्रत ठेवतात. तर ब्रम्हमुहूर्ताच्या वेळी उठून स्नान करावे. त्यानंतर देवी लक्ष्मी आणि नारायण यांच्या फोटोंची पूजा करावी. देवांच्या समोर धूप, दिवा प्रज्वलित करुन चंदन, श्वेत कमल किंवा श्वेत गुलाबांनी पूजा करावी. त्यानंतर घराच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करा.