आषाढी एकादशी 2019 साठी पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक रोषणाई
या महाएकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रूक्मिणीच्या मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
Pandharpur Vitthal Mandir 2019 Decoration: आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) दिवशी वैष्णवांचा मेळा पंढरपुरात दाखल होतो. यंदा 12 जुलै दिवशी वारकरी आणि सामान्य विठू भक्त विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला (Pandharpur) दाखल होणार आहेत. सध्या ज्ञानोबा आणि तुकारामांच्या पालख्या पंढरपूरच्या वेशीपर्यंत येऊन पोहचल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपूरातील विठुरायाच्या मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. 'आषाढी एकादशी' ला देवशयनी एकादशी का म्हणतात? जाणून घ्या या दिवसाचे महत्व
आषाढी एकादशी 2019 साठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील रोषणाई
विठ्ठल मंदिरामध्ये महाद्वार, रुक्मिणी द्वार आणि पश्चिम द्वार यांच्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तसेच तुकाराम भवन आणि दर्शन मंडपही उजाळून निघालं आहे. नामदेव पायर्या भागावर एलईडी बल्ब आणि माळांनी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तर मंदिराचा कळसही आकर्षक सजवण्यात आला आहे.
यंदा विठ्ठल मंदीरात प्लॅटफॉर्म उभारण्यात आल्याने भक्तांना विठोबाचे मुखदर्शन घेणं सुकर होणार आहे. सध्या वारकरी आणि विठू भक्तांसाठी मंदीर 24 तास खुले करण्यात आलं आहे. यामुळे भाविकांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. आषाढी एकादशी दिवशी राज्याचे मुख्यमंत्री आणि दर्शनाच्या रांगेतील एक जोडपं एकत्रितपणे विठू रायाची पूजा करते. पंढरपूर: आषाढी एकादशी 2019 च्या पार्श्वभूमीवर विठ्ठल- रुक्मिणीच्या मंदिरामध्ये बदल; मुखदर्शन होणार सुकर
सामान्यांना पंढरपूर गाठाता यावं याकरिता एसटी प्रशासनानेदेखील खास बससेवा सुरू केली आहे. त्याकरिता चार विशेष स्थानकं देखील उभारण्यात आली आहेत. आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरात चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.