सौंदर्य खुलवणारी 5 स्टायलीश फुटवेअर्स; तुमच्या फॅशनचेही होईल कौतूक

इथे आम्ही आपल्याला सूचवत आहोत ५ स्टायलीश फुटवेअर्स. जी खुलवतील तुमच्या पायांचे सौंदर्य

(संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

स्टायलिश राहणे म्हणजे केवळ आकर्षक कपडे आणि मेकअप करणे नव्हे. तर, आपल्या शरीरयष्टीला योग्य असा पेहराव करणे. ज्यात डोक्यावरच्या केसांपासून पायांतील चप्पलपर्यंत अशा सर्व घटकांचा समावेश होतो. अनेकदा तर, ड्रेस सुंदर असतो. हेअर स्टाईलही जबरसदस्त असते. विविध ज्वेलरी वापरून हे सौंदर्य अधिक प्रभावी बनवले जाते. मात्र, या प्रभावाला एकाच गोष्टीची कमतरता असते. ती म्हणजे पायातील चप्पल. म्हणूनच पायांचे सौंदर्य अधिक प्रभावीपणे वाढविण्यासाठी चप्पल, सॅंडल्स किंवा शूज म्हत्त्वाचे ठरतात. इथे आम्ही आपल्याला सूचवत आहोत ५ स्टायलीश फुटवेअर्स. जी खुलवतील तुमच्या पायांचे सौंदर्य.

ब्लॅक स्टिलेटोज

...जर तुम्ही वेस्टर्न स्टाईलचे चाहते असाल आणि गाऊन वापरणे पसंत करत असाल तर, तुमच्यासाठी ब्लॅक स्टिलेटोच फायदेशीर ठरतील. ब्लॅक कलरमध्ये स्टिलेटोज कोणत्याही पद्धतीच्या गाऊन, ड्रेस किंवा एलबीडीसोबत छान दिसतात. तुम्ही जर ब्लॅक स्टिलेटोज वापरले असतील तर, तुमच्या पर्नालिटीलाही एक वेगळाच लूक येतो. वापरताना फक्त एक ध्यानात ठेवा की ते तुमच्यासाठी कंफर्टेबल आहेत किंवा नाही.

ट्रॅडीशनल चप्पल

जर तुम्हाला पारंपरीक पोषाख करणे आवडत असेल तर, तुमच्यासाठी ट्रॅडीशनल चप्पल केव्हाही भारी. खास करुन कोल्हापुरी चप्पल. कुर्ता, सलवार कुर्ता, धोतर अशा कपड्यांवर ही चप्पल छान दिसते. अगदी जिन्सवरही ही चप्पल सुंदरच दिसते.

व्हाईट स्निकर्स

व्हाईट स्निकर्स आजकाल भलतीच ट्रेंडमध्ये आहे. हा प्रकार तुम्ही कोणत्याही वेस्टर्न ड्रेसवर ट्राय करु शकता. याचे खास वैशिष्ट्य असे की, तुम्ही कोणत्याही रंगाचा ड्रेस, टी-शर्ट, शर्ट, टॉप किंवा कुर्ता वापरला असाल तरीही त्यावर स्निकर्स उठूनच दिसते. स्निकर्स हे वापरायलाही अतिशय कंफर्टेबल असते. महत्त्वाचे म्हणजे खिशाला परवडणाऱ्या किमतीत मिळते.

ट्रॅडिशनल सॅंडल्स

तुम्ही कधी कधी ट्रॅडिशनल सँडल्सही ट्राय करु शकता. तुम्हाला एखाद्या खास पार्टीत, कार्यक्रमाला, घरगुती कार्यक्रमांना जायचे असेल तर, हे सँडल्स कामी येतात.

स्टेटमेंट शूज

तुमच्याकडे हे शूज असायला हवेतच हवेत.. भलेही आपण प्रत्येक स्टाईलचा ड्रेस वारत नाही तरीही. अनेकदा कोणत्याही साध्या ड्रेसलाही स्टेटमेंट शूज स्टायलिश बनवताना दिसतात.