चष्म्यामुळे येणारे डाग हटवण्यासाठी 'या' सोप्या टीप्स
मात्र सातत्याने चश्मा घातल्याने नाक आणि डोळ्यांच्या आजूबाजूला निशाण येतात. त्यामुळे चेहऱ्यावरील हे निशाण समोरुन पाहिल्यास खराब दिसतात.
तुम्हाला जर चष्मा असल्यास तो अगदी काळजीपूर्वक वापरावा असे सांगितले जाते. मात्र सातत्याने चष्मा घातल्याने नाक आणि डोळ्यांच्या आजूबाजूला निशाण येतात. त्यामुळे चेहऱ्यावरील हे निशाण समोरुन पाहिल्यास खराब दिसतात. परंतु तुम्हाला चष्मामुळे चेहऱ्यावर निर्माण झालेले डाग दूर करायचे असल्यास तर काही घरगुती उपाय त्यासाठी करु शकता. चेहऱ्यावरचे डागच नाही तर तुमचे सौंदर्य सुद्धा अधिक खुलून दिसेल.
चष्म्यामुळे नाक आणि डोळ्यांच्या येथे येणारे डाग दूर करायचे असल्यास कोरडफडच्या आतील गर काढून तो डोळे आणि आजूबाजूच्या त्वचेवर लावा. जेणेकरुन चेहऱ्यांवरील पुटकुळ्या किंवा डाग दूर होण्यास मदत होईल. यामधील दुसरा उपाय म्हणजे संत्र्यांच्या साली सुखवून त्या वाटून घ्या. त्यानंतर जी पावडर तयार होईल त्यात दूध मिसळून ती पेस्ट चेहऱ्याला लावा. असे केल्याने चेहरा तजेलदार आणि डाग कमी करण्याचे काम करेल. नाहीतर बटाटा किसून घेऊन त्यातून रस काढून तो डाग आलेल्या ठिकाणी लावल्यास ते दूर होतील.(थंडीत कशा पद्धतीचा मेकअप कराल; मेकअप आर्टिस्ट विनायक वरदे यांच्याकडून माहित करून घ्या काही खास टिप्स)