Prada च्या रॅम्प वर 'कोल्हापुरी चपला' पुन्हा भारताचा उल्लेख टाळल्याने भडकले नेटकरी

फॅशन एक्सपर्ट्स आणि सोशल मीडीयावरील अनेक युजर्सनी पुन्हा एकदा प्राडा करून भारतीय संस्कृतीचा एक भाग असलेल्या कोल्हापुरी चप्पलांपासून प्रेरणा घेऊनही त्याचं मूळ कुठलं आहे? हे सांगणं टाळल्याने राग व्यक्त केला जात आहे.

Prada takes fashion inspiration from Kolhapuri chappals | Instagram@Prada

इंडियन फॅशन आता जागतिक स्तरावर मोठी झेप घेत आहे. नेहरू जॅकेटपासून ते पगड्यांपर्यंत, कंबर पट्टापासून ते दुपट्टा-स्टाईल स्कार्फपर्यंत, पारंपारिक भारतीय शैली अनेकदा आंतरराष्ट्रीय फॅशन शो मधील रॅम्प वॉक वर दिसल्या आहेत. आता, आणखी एक वस्तू जागतिक फॅशनच्या मंचावर आली आहे. Prada च्या Men Spring Summer 2026 collection मध्ये रॅम्प वॉक वर चक्क 'कोल्हापुरी चप्पल' स्टाईल वर आधारीत चपला मॉडेल्सच्या पायात दिसल्या आहेत. लक्झरी फॅशन ब्रँडच्या कपड्यांमध्ये आणि अॅक्सेसरीजमध्ये एका गोष्टीने सार्‍यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामध्ये एक सपाट, तपकिरी रंगाचा लेदर सँडल ज्यामध्ये पायाच्या बोटावर लूप होता आणि तो भारताच्या प्रतिष्ठित कोल्हापुरी चप्पलसारखा दिसत होता. जागतिक व्यासपीठावर या चपला पाहून अनेकजण आनंदित झाले होते, तर काहींनी त्याच्या भारतीय मूळाचा उल्लेख न केल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.

कोल्हापुरी चप्पलची ख्याती

कोल्हापुरी चप्पल ही महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरात बनणारी चामड्याची चप्पल आहे. कुशल कारागिर ती हाताने बनवतात. मागील १०० वर्षांहून अधिक काळापासून या चपला बनवल्या जात आहेत. कोल्हापुरी चपला त्यांच्या सपाट सोल, मजबूत बांधणी आणि पायाच्या बोटाच्या लूपसह खास डिझाइनसाठी ओळखले जातात.

कोल्हापुरी चप्पलांचं प्राडा कडून रिब्रॅन्डिंग?

 

View this post on Instagram

 

A post shared by India Cultural Hub (@indiaculturalhub)

 

View this post on Instagram

 

A post shared by The Runway Edit (@the.runway.edit)

प्राडा च्या रॅम्प वॉकची झलक

 

View this post on Instagram

 

A post shared by Prada (@prada)

फॅशन एक्सपर्ट्स आणि सोशल मीडीयावरील अनेक युजर्सनी पुन्हा एकदा प्राडा करून भारतीय संस्कृतीचा एक भाग असलेल्या कोल्हापुरी चप्पलांपासून प्रेरणा घेऊनही त्याचं मूळ कुठलं आहे? हे सांगणं टाळल्याने राग व्यक्त केला जात आहे. दरम्यान यापूर्वीही अनेक भारतीय फॅशन वरून प्रेरणा घेऊनही त्यांनी त्याचा उल्लेख टाळणं आणि रिब्रॅन्डिंग करणं असा प्रकार केला आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement