Covid-19 in Miss World 2021: मिस वर्ल्ड 2021 मध्ये कोविड-19 चा शिरकाव; स्पर्धक आणि कर्मचार्‍यांसह 17 लोकांचे अहवाल सकारात्मक- Reports

मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा ज्युलिया मार्ले यांनी जाहीर केले आहे की, कोरोनामुळे प्रभावित झालेल्या स्पर्धकांना, त्यांचा अहवाल नकारात्मक येईपर्यंत स्पर्धेच्या मंचावर जाण्याची परवानगी नाही

मिस वर्ल्ड (प्रातिनिधिक-संग्रहित-संपादित प्रतिमा)

मिस युनिव्हर्स 2021 नंतर आता चर्चा रंगू लागली आहे ती, मिस वर्ल्ड 2021 ची (Miss World 2021). भारताने नुकतेच एका मोठ्या स्पर्धेत विजयाची चव चाखली आहे. हरनाज संधू मिस युनिव्हर्स 2021 ची विजेती ठरल्यानंतर आता मिस वर्ल्ड स्पर्धेत मानसी वाराणसीकडून देशाला आशा आहेत. परंतु दुसरीकडे स्पर्धेवर कोरोना विषाणूचे (Coronavirus) सावटही आहे. आता एक महत्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे, रिपोर्ट्सनुसार मिस वर्ल्ड 2021  या कार्यक्रमात कोरोनाचा प्रवेश झाला आहे. स्पर्धेतील अनेक उमेदवार आणि अनेक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या बातम्या आहेत.

मिस वर्ल्ड 2021 स्पर्धा यावेळी पोर्तो रिको (Puerto Rico) येथे आयोजित केली आहे. तेथील आरोग्य विभागाने पुष्टी केली आहे की स्पर्धेतील सुमारे 17 उमेदवार आणि कर्मचाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 16 डिसेंबर रोजी ‘द नॅशनल न्यूज टुडे’च्या माध्यमातून पोर्तो रिकन वृत्तपत्र प्राइमरा होरा यांनी याबाबत वृत्त दिले होते. एजन्सीचे प्रवक्ते लिस्दान एसेवेडो यांनी सांगितले की, मिस वर्ल्डमध्ये 17 केस पॉझिटिव्ह आहेत. काल 7 प्रकरणे नमूद करण्यात आली होती परंतु आता प्रकरणे 17 वर पोहोचली आहेत.

या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात असल्याचे आश्वासन एसेवेडो यांनी दिले आहे. यादरम्यान आरोग्याशी संबंधित सर्व प्रोटोकॉल पाळले जात आहेत. कोरोना विषाणूची लागण झालेल्यांनाही लस दिली जात आहे. रुग्णालयात दाखल करावे लागेल अशी स्थिती एकाही स्पर्धकाची नाही. काहींमध्ये अगदी किरकोळ लक्षणे दिसून आली आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धकांना 10 दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. (हेही वाचा: Omicron: डेल्टा पेक्षा 70 पट वेगाने वाढत आहे ओमायक्रॉन; ठरू शकते धोक्याची घंटा)

दरम्यान, मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा ज्युलिया मार्ले यांनी जाहीर केले आहे की, कोरोनामुळे प्रभावित झालेल्या स्पर्धकांना, त्यांचा अहवाल नकारात्मक येईपर्यंत स्पर्धेच्या मंचावर जाण्याची परवानगी नाही. असे स्पर्धक मिस वर्ल्डच्या शर्यतीत कायम राहतील. विषाणूची लागण झाल्यामुळे स्पर्धकांची स्वप्ने अपूर्ण राहू नयेत, यासाठी अशा स्पर्धकांचे पूर्व-रेकॉर्ड केलेले व्हिडिओ देखील पाहण्यात येणार आहेत. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif