विंग कमांडर अभिनंदन यांच्या मिशा 'राष्ट्रीय मिशा' म्हणून घोषित कराव्या; कॉंग्रेस नेते अधीर रंजन यांची मागणी
बीजेपीद्वारे (BJP) ‘अभिनंदन’ यांचे नाव घेतल्याच्या मुद्द्यावर टिपण्णी करत, अभिनंदन यांच्या मिशा या 'राष्ट्रीय मिशा’ (National Moustache) म्हणून घोषित कराव्या अशी मागणी केली.
लोकसभेमध्ये (Lok Sabha) सोमवारी पक्ष आणि विपक्ष यांच्यामध्ये वादविवाद चालू होते. दोन्ही बाजूकडील लोक आपला मुद्दा पटवून सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या वादविवादात एक क्षण असा आला जेव्हा सर्व नेत्यांना शांत राहावेच लागले. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी लोकसभा निवडणुकांदरम्यान, बीजेपीद्वारे (BJP) ‘अभिनंदन’ (Abhinandan Varthaman) यांचे नाव घेतल्याच्या मुद्द्यावर टिपण्णी करत, अभिनंदन यांच्या मिशा या 'राष्ट्रीय मिशा’ (National Moustache) म्हणून घोषित कराव्या अशी मागणी केली. यावेळी अधीर रंजन चौधरी यांनी विंग कमांडर अभिनंदन यांची बालाकोट एअर स्ट्राइक बाबत दिलखुलास तारीफ केली.
यावेळी अधीर रंजन चौधरी यांनी पीएम नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाना साधला. चौधरी यांनी पीएम मोदी यांच्यासमोर, 2 जी आणि कोळसा घोटाळ्यामध्ये कोणालाही का पकडण्यात आले नाही? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच ते पुढे म्हणाले, ‘तुम्ही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चोर म्हणत सत्तेत आलात. मात्र अजूनही तुम्ही त्यांना तुरुंगात का पाठवले नाही? आजही ते संसदेमध्ये कसे काय दिसून येतात?.’ (हेही वाचा: भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सूरतगड येथील एअर फोर्स तळावर पोस्टिंग)
एअर स्ट्राइकनंतर विंग कमांडर अभिनंदन यांची लोकप्रियता फारच वाढली. लोकांसाठी अभिनंदन हे प्रेरणा ठरू लागले. नुकत्याच पार पडलेल्या भारत पाकिस्तान विश्वचषक सामन्याच्या आधी, भारताकडून जी जाहिरात बनवण्यात आली होती त्यामध्येही अभिनंदन यांच्या मिशांचा मुद्दा दाखवण्यात आला होता. आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणवर धन्यवाद प्रस्तावाबाबत चर्चा झाली. याची सुरुवात केंद्रीय मंत्री प्रताप चंद्र सारंगी यांनी केली.